Eknath Khadse Spoke on Raksha Khadse Saam TV
महाराष्ट्र

Eknath Khadse News: सुनबाईला केंद्रात मंत्रीपदाची लॉटरी, एकनाथ खडसेंच्या डोळ्यात आनंदाश्रू; म्हणाले...

Eknath Khadse Spoke on His Dauther in Law Raksha Khadse: रक्षा खडसे यांची केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर भाजप प्रवेशाच्या प्रतिक्षेत असलेले नेते एकनाथ खडसे यांनी भावुक प्रतिक्रिया दिली आहे.

Gangappa Pujari

किरण सोनवणे, जळगाव|ता. ९ जून २०२४

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज देशात एनडीए सरकार स्थापन होत आहे. राज्यातील ६ नेत्यांना केंद्रात मंत्रीपदाची लॉटरी लागली आहे. यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या खासदार रक्षा खडसे यांचाही समावेश आहे. रक्षा खडसे यांची केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर भाजप प्रवेशाच्या प्रतिक्षेत असलेले नेते एकनाथ खडसे यांनी भावुक प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले एकनाथ खडसे?

'गेल्या अनेक वर्षांपासून घेतलेल्या परिश्रमाचे चीज रक्षाताईंच्या मंत्रीपदाच्या माध्यमातून होत आहे. माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाच्या क्षणांपैकी हा एक क्षण असून माझे आनंदाश्रू आवरले जात नाहीत' अशा शब्दांमध्ये भावपूर्ण प्रतिक्रिया आमदार एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केली. तर मोदी सरकारच्या मंत्रीमंडळाच्या शपथविधीसाठी आपण दिल्लीस जात असल्याची माहितीही त्यांनी दिली.

राज्यातील या ६ नेत्यांना मंत्रीपदाची लॉटरी

दरम्यान, आज नव्याने स्थापन होणाऱ्या एनडीए सरकारमध्ये राज्यातील सहा दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. यामध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते नितीन गडकरी, पियूष गोयल, मुरलीधर मोहोळ रक्षा खडसे यांच्यासह शिवसेना शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव आणि आरपीआयचे रामदास आठवले यांचा समावेश आहे.

दरम्यान, पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना पहिल्याच प्रयत्नात थेट केंद्रीय मंत्रीपदाची लॉटरी लागली आहे. पुणेकरांची जशी सेवा केली तशी देशाची सेवा करायची आहे. स्वप्नातही वाटलं नव्हत मंत्रिपद मिळेल. पण अचानक फोन आला आणि सांगितल तुम्हाला शपथ घ्यायची आहे, असं सांगितल्याची प्रतिक्रिया मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: धावत्या ट्रेनमधून तरुण पडला, दारावर उभं राहून स्टंट करताना भयंकर घडलं; काळजाचा ठोका चुकवणा VIDEO

Maharashtra Budget 2026 Live Updates : मुंबई आग्रा महामार्गावर चाकूचा धाक दाखवून लुट

सासू, साडू, मेहुणीकडून मानसिक छळ; सासरच्या जाचाला कंटाळून तरुणाने स्वतःचे जीवन संपवले

भाजप नेत्याच्या मुलाने UPSC परीक्षेत मिळवला तिसरा क्रमांक; मुख्यमंत्र्यांनी फोनवरून दिल्या शुभेच्छा

Crime: मित्राला घरी आणल्यामुळे वाद, तरुणाने सख्ख्या भावाची चाकूने वार करत केली हत्या

SCROLL FOR NEXT