Pimpri Chinchwad Saam tv
महाराष्ट्र

Pune News : पिझ्झा मागवला म्हणून मुलींना हॉस्टेलमधून बाहेर काढलं, समाजकल्याण वसतिगृहातील धक्कादायक प्रकार!

Pimpri Chinchwad news : काही विद्यार्थिनींनी दोन दिवसांपूर्वी खाण्यासाठी बाहेरून पिझ्झा ऑर्डर केला होता. हा पिझ्झा डिलिव्हरी करण्यासाठी डिलिव्हरी बॉय आला असता त्याच्याकडून मुलींनी पिझ्झा घेतला

गोपाळ मोटघरे

पिंपरी चिंचवड : शिक्षणानिमित्ताने घरापासून दूर शहरात आलेल्या विद्यार्थिनी वसतिगृहात राहतात. समाजकल्याणच्या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनींनी खाण्यासाठी बाहेरून पिझ्झा मागविला, मात्र हा पिझ्झा मागविल्याने या विद्यार्थिनींना शिक्षा भोगावी लागली. सदर विद्यार्थिनिंना हॉस्टेलमधून बाहेर काढल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये घडला आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील मोशी परिसरात समाज कल्याण विभागाचे मुलींचे वसतीगृह आहे. याच ठिकाणी असलेल्या काही विद्यार्थिनींनी दोन दिवसांपूर्वी खाण्यासाठी बाहेरून पिझ्झा ऑर्डर केला होता. हा पिझ्झा डिलिव्हरी करण्यासाठी डिलिव्हरी बॉय आला असता त्याच्याकडून मुलींनी पिझ्झा घेतला. मात्र ही बाब वसतिगृहाच्या गृहप्रमुख मिनाक्षी नारहारे यांना कळली आणि त्यांनी एक अजब फतवा जारी केला. 

एका महिन्यासाठी हॉस्टेलवर येण्यास बंदी 

दरम्यान वसतिगृहाच्या गृहरक्षक नारहारे यांना समजल्यानंतर त्यांनी मुलींची चौकशी केली. वसतिगृहात एका खोलीत राहणाऱ्या चार विद्यार्थिनी पैकी नेमका पिझ्झा कुणी मागवला? याची विचारणा केली असता पिझ्झा कोणी मागविला हे स्पष्ट झाले नाही. या कारणावरून गृहरक्षक नारहारे यांनी रूममधील चारही मुलींना एका महिन्यासाठी हॉस्टेलवर येण्यास बंदी घातली आहे. 

पालकांना दिले पत्र 
हॉस्टेलवर राहणाऱ्या मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून बाहेरील व्यक्ती किंवा खाद्य पदार्थ आणण्यास नियमानुसार बंदी आहे. मात्र हा नियम डावलत मुलींनी पिझ्झा मागवला आणि त्यामुळे कारवाई केली जात असल्याचे विद्यार्थिनी आणि पालकांना एका लेखी पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. मात्र अशा चुकांसाठी विद्यार्थिनी प्रवेश बंदी करण्याचे आदेश सामाजिक न्याय विभागाने परित केले आहेत का? याचा खुलासा होत नसल्याने पालकांमध्ये संताप आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आसाममध्ये सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांचे भव्य स्वागत

Maharashtra Government : पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर महाराष्ट्र सरकारनं घेतले ३ मोठे निर्णय, अधिकार्‍यांच्या दौऱ्यावर बंदी अन्...

IPL Playoff Scenario: पंजाबच्या पराभवाचा फायदा चेन्नई-कोलकात्याला, वाचा ८ संघाचे प्लेऑफचे नेमकं गणित

Diabetes Diet Tips: डायबिटीजमध्ये ब्रेड खावा की नाही? रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी हे 3 ब्रेड ठरतील बेस्ट

शेकाप आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या वडिलांचं निधन; सांगोला परिसरात शोककळा

SCROLL FOR NEXT