Fraud Case Saam tv
महाराष्ट्र

Fraud Case : शेअर मार्केटच्या नावाने अनेकांना लाखोंचा गंडा; तीनजण पोलिसांच्या ताब्यात

Pimpri Chinchwad : शेअर मार्केटच्या नावाने नागरिकांना लाखो रुपयांचा आर्थिक गंडा घालणाऱ्या रोहीत पटाडीया, विशाल कदम आणि रमजान सदिक चौहान या तीन आरोपींना सायबर पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत

गोपाळ मोटघरे

पिंपरी चिंचवड : शेअर मार्केटच्या नावाने फसवणूक करण्यात आल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. असाच प्रकार समोर आला असला असून तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे या तिन्ही जणांना पुणे जिल्ह्यात आणून बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले आहे. 

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाने फसवणुकीचे प्रकार अनेकदा समोर आले आहेत. त्यानुसार पुण्यात समोर आलेल्या प्रकरणात सायबर पोलीसांनी शेअर मार्केटच्या नावाने नागरिकांना लाखो रुपयांचा आर्थिक गंडा घालणाऱ्या तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. यात रोहीत पटाडीया, विशाल कदम आणि रमजान सदिक चौहान या तीन आरोपींना सायबर पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर मुख्य आरोपी सुरज खेडेकर हा अद्याप फरार असुन त्याचा पोलीस शोध घेत आहेत. 

लाखो रुपयांची फसवणूक 

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या या सर्व आरोपी मिळून पिंपरी चिंचवड शहरातील एका गुंतवणूकदाराला ६७ लाख ६९ हजार ९५० रुपये वेगवेगळ्या बँके अकाउंटमध्ये जमा करायला लावले. या माध्यमातून लाखो रुपयाची आर्थिक फसवणूक केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. 

राजस्थानमधून तिघांना आणत फसवणूक 

शेअर मार्केटच्या नावाने लाखो रुपयांचा फायनान्शिअल फ्रॉड करण्यासाठी राजस्थान मधील नागोर गावातील व्यक्तींना पुणे जिल्ह्यात आणून, बनावट कागदपत्रांच्या द्वारे त्यांचे बँक अकाउंट उघडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवड शहरा सायबर पोलिसांनी उघडकीस आणला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live: बीड तालुक्यातील श्री क्षेत्र चाकरवाडी येथे नारळ-पेढा विक्री करणाऱ्या महिलांमध्ये तुंबळ हाणामारी

ओट्स की दालिया? वजन कमी करण्यासाठी नाश्त्याला काय खावे?

Vidarbha Heavy Rain: विदर्भात पावसाचा हाहाकार, एकाच कुटुंबातील तिघांसह ६ जणांचा मृत्यू

Terror Attack : जम्मू- काश्मीरमध्ये मोठा दहशवादी हल्ला, नाव विचारून गोळ्या झाडल्या; 2 जणांचा मृत्यू

Marathi Serial Off Air : लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; अवघ्या वर्षभरातच गाशा गुंडाळला, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT