पिंपरी चिंचवड : व्हॅलेंटाईनच डे साजरा करण्यासोबत काही ठिकाणी रात्री उशिरापर्यंत पार्टीचे आयोजन देखील करण्यात आले होते. मध्यरात्री उशिरापर्यंत हुक्कासारख्या अंमली पदार्थाची रेव पार्टी करणाऱ्या बार वर पिंपरी चिंचवड शहर पोलिसांनी धाड टाकत कारवाई केली आहे. या कारवाई दरम्यान पोलिसांनी १० लाखापेक्षा अधिकचा मुद्देमाल जप्त केला आहे.
प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे व्हॅलेंटाईन डे. हा दिवस अनेकजण साजरा करताना पार्ट्या करत असतात. मोठ्या शहरांमध्ये रात्री उशिरापर्यंत पार्टी करत एन्जॉय करत असतात. मात्र बावधन पोलीस स्टेशन हद्दीतील बॉम्बे हाय बार/ ब्रिस्टो बार ह्या बारवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी मध्यरात्री २ वाजून ५० मिनिटांदरम्यान धाड टाकत कारवाई केली. ज्या वेळी पोलिसांनी धाड टाकली त्यावेळी बॉम्बे हाय बार मध्ये जवळपास दीडशे ते दोनशे तरुण हजर होते.
नागरिकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी कारवाई
या पार्टीमध्ये सहभागी असलेले तरुण महागडी दारू आणि हुक्का पॉटच्या नशेत हे तरुण मध्यरात्री उशिरापर्यंत व्हॅलेंटाईन डे ची पार्टी करत होते. पोलिसांनी आखून दिलेल्या वेळेनंतरही बॉम्बे हाय बार सुरू राहत आहे; अशी तक्रार परिसरातील नागरिकांनी पिंपरी-चिंचवड शहर पोलिसांकडे केली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
दहा लाखांचा मुद्देमाल जप्त
पिंपरी चिंचवड पोलिसांनी मध्यरात्रीनंतर केलेल्या या कारवाईमध्ये सदर बारमध्ये असलेले कॉम्पुटर सेटअप, म्युझिक सिस्टम, सोफा सेट, राऊंड टेबल, चेअर्स, सीसीटीव्ही डीव्हीआर आणि हुक्का पॉट असा जवळपास दहा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.