Pimpri Chinchwad News Saam tv
महाराष्ट्र

Pimpri Chinchwad News : एक कोटींच्या खंडणीसाठी अपहरण करून डांबले; पोलिसांनी सुटका करत तिघांना घेतले ताब्यात

Pimpri chinchwad News : सदर प्रकरणात अपहरण झालेल्या व्यक्तीची पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या खंडणी विरोधी पोलीस पथकाने सुटका केली आहे

गोपाळ मोटघरे

पिंपरी चिंचवड : हिंजवडी पोलीस स्टेशन हद्दीतून एका व्यक्तीचा अपहरण करण्यात आलं होतं. यानंतर एक कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली होती. मात्र पिंपरी चिंचवड पोलिसांनी तपास करत गंगा नदीच्या बेटावर डांबून ठेवलेल्या व्यक्तीची सुटका करत अपहरणकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. 

सदर प्रकरणात अपहरण झालेल्या व्यक्तीची (Pimpri Chinchwad News) पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या खंडणी विरोधी पोलीस पथकाने सुटका केली आहे. पश्चिम बंगाल पोलिसांच्या मदतीने गंगा नदीवरील गोलढाब बेटावर धाड टाकून पोलीसांनी अपहरण करणाऱ्या तीन आरोपीना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. नसीम मणिरूल हक, लल्लू रुस्तम शेख आणि साजीम करीम बबलू शेख या तीन आरोपींना (Police) पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर एक आरोपी हा फरार झाला आहे. 

दरम्यान अपहरण करणाऱ्या आरोपींनी आपल्या कल्याणी येथील एका मित्राच्या मदतीने अपहरण केलेल्या व्यक्तीच्या मुलाकडे मोबाईलवर एक कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. खंडणी न दिल्यास वडिलांना जीवे ठार मारून टाकण्याची धमकी आरोपींनी अपहरत व्यक्तीच्या मुलाला दिली होती. अपहरण केलेल्या व्यक्तीला पश्चिम बंगाल आणि झारखंडच्या बॉर्डरवरून वाहणाऱ्या गंगा नदीच्या एका बेटावर डांबून ठेवलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Zakir Khan : प्रसिद्ध कॉमेडियनची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील 'त्या' VIDEO मुळे चाहते चिंतेत

Maharashtra Live News Update : मुख्यमंत्र्यांचा 'डॉक्टर ऑफ सायन्स' पदवी देवून होणार सन्मान

Crime: बायकोचं अनैतिक संबंध असल्याचा नवऱ्याला संशय, भेटायला बोलावून तरुणाला जागीच संपवलं; ठाणे हादरले

Accident News : देवदर्शनाहून परतताना काळाचा घाला, यात्रेकरूंची बस दरीत कोसळून भीषण अपघात; ७ जणांचा मृत्यू

Fish Fry Masala Recipe: मासे तळायचा मसाला घरी कसा बनवायचा

SCROLL FOR NEXT