Cyber Crime Saam tv
महाराष्ट्र

Cyber Crime : आयटी अभियंत्याची जादा नफ्याच्या आमिषातून फसवणूक; परदेशातील संशयितासह एकजण ताब्यात

Pimpri Chinchwad News : ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार माहिती काही दिवसांत मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. गुंतवणुकीच्या नावाने फसवणूक केली जात असून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास त्या बदल्यात जादा नफा देण्याचे आमिष दिले जात आहे.

गोपाळ मोटघरे

पिंपरी चिंचवड : आयटी कंपनीमध्ये काम करणाऱ्या आयटी अभियंत्यांची शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास ज्यादा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून ऑनलाईन फसवणूक करण्यात आली होती. यास साधारण ७१ लाखात फसवणूक झाली होती. या प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सायबर पोलिसांनी परदेशातील संशयित आरोपीस अटक केली आहे.

ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार माहिती काही दिवसांत मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. गुंतवणुकीच्या नावाने फसवणूक केली जात असून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास त्या बदल्यात जादा नफा देण्याचे आमिष दिले जात आहे. याला अनेकजण बळी पडत असतात. अशाच प्रकारे आयटी कंपनीत काम करणाऱ्या अभियंत्याची देखील फसवणूक झाल्याचा प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये समोर आला आहे. 

आयटी अभियंता यास संशयित आरोपीने संपर्क करून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. यातून जादा नफा देण्याचे आमिष दिले. यावर विश्वास ठेवून पैशांची गुंतवणूक करण्यास सुरवात केली. यात साधारण अभियंता तरुणाची ७१ लाख ५ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे. याबाबत संबंधिताने पिंपरी चिंचवड पोलिसात तक्रार दाखल केली होती. 

दोनजण ताब्यात 

त्यानुसार पिंपरी चिंचवडच्या सायबर पोलिसांनी तपास करत फसवणूक करणाऱ्या रशियन देशातील लिंलिनस्काय या परिसरातील असलेल्या 30 वर्षीय संशयित आरोपी अंनटोली मिनरोव्ह याला गोव्यातून तर त्याचा पुण्यातील साथीदार श्रेयश माने याला देखील पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी अधिक तपास पिंपरी चिंचवड पोलिस करत आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips : दातांमध्ये गॅपमुळे मनमोकळे हसता येईना! हसताना लाज वाटतेय? या उपाय खुलवतील तुमचं हास्य

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

SCROLL FOR NEXT