Sant Dnyaneshwar Mauli  Saam tv
महाराष्ट्र

Raksha Bandhan : ज्ञानेश्वर माऊलींना दोन तोळे सोन्याची राखी अर्पण; वारकरी गाडे कुटुंबियांकडून सलग तिसऱ्या वर्षी दिली राखी

Pimpri Chinchwad News : बहिण भावांचा अतिशय पवित्र अशा नात्यांचा सण म्हणजे रक्षाबंधन. या सणाच्या निमित्ताने वाघोलीतील गाडे कुटुंबीयांनी ज्ञानेश्वर माऊलींना दोन तोळ्यापेक्षा जास्त वजनाची सोन्याची राखी अर्पण केली आहे

गोपाळ मोटघरे


आळंदी : रक्षाबंधनानिमित्त बहीण भावाला राखी बांधून आपले नाते घट्ट करत असते. त्यानुसार रक्षाबंधनाचे औचित्य साधून आज आळंदी येथे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत ज्ञानेश्वर माऊली यांना वाघोली येथील गाडे या वारकरी कुटुंबीयांनी सोन्याची राखी अर्पण केली आहे. साधारण दोन तोळे वजनाची हि राखी आहे. 

बहिण भावांचा अतिशय पवित्र अशा नात्यांचा सण म्हणजे (Raksha Bandhan) रक्षाबंधन. या सणाच्या निमित्ताने वाघोलीतील गाडे कुटुंबीयांनी ज्ञानेश्वर माऊलींना दोन तोळ्यापेक्षा जास्त वजनाची सोन्याची राखी अर्पण केली आहे. वारकरी मंडळी हे ज्ञानेश्वर माऊलींना आपला माय, बाप, भाऊ आणि बहीण अस सर्व काही मानत असतात. अशा आपल्या बंधू स्वरूप ज्ञानेश्वर माऊली प्रति आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वाघोली येथील गाडे ह्या वारकरी कुटुंबीयांनी सलग तिसऱ्या वर्षी सोन्याच्या राखी ज्ञानेश्वर माऊलीला (Sant Dnyaneshwar Mauli) अर्पण करून रक्षाबंधनाचा सण साजरा केला आहे. 

शेतकऱ्यांना सुख शांती लाभू दे 

तसेच यंदा पडलेल्या दुष्काळातून राज्यातील शेतकऱ्यांना शासकीय मदतीचा आर्थिक दिलासा मिळू दे. तसेच शेतकऱ्यांची सुख, शांती आणि समृध्दीने भरभरून प्रगती होऊ दे; अशी प्रार्थना देखील गाडे कुटुंबीयांनी यावेळी ज्ञानेश्वर माऊलीकडे केली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandurbar : BA पास तरुण करायचा महिलांची प्रसूती, बोगस डॉक्टरचा पर्दाफाश; असा अडकला जाळ्यात

Kidney Detox Drinks: किडनीतील घाण बाहेर काढतील 'हे' 5 घरगुती ड्रिंक, रोज प्यायल्यास मूत्रपिंड होईल स्वच्छ

Maharashtra News Live Update: भोंदू अशोक खरातच्या अडचणीत आणखी वाढ, सिन्नर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल

क्रिकेटच्या मैदानात राडा घालणारा श्रेयस अय्यर आहे जादूगार! 52 पत्त्यामधून नेमका काढला बदामचा एक्का, व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार अन् पेन्शन कितीने वाढणार? वाचा नवीन अपडेट

SCROLL FOR NEXT