Cyber Police Saam tv
महाराष्ट्र

Cyber Police : सायबर गुन्हेगारीतील मुख्य सूत्रधाराशी पाचजण ताब्यात; पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी कारवाई

Pimpri Chinchwad News : वेगवेगळ्या वेबसाईटद्वारे तसेच व्हाट्सअप आणि टेलिग्रामद्वारे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यानंतर मोठ्या परतावा देण्याचे आमिष दाखविले. गुंतवणूकदारांना लाखो रुपयांचा आर्थिक गंडा घालत होते

गोपाळ मोटघरे

पिंपरी चिंचवड : मागील काही दिवसांपासून सायबर गुन्हेगारी वाढली आहे. यात अनेकांची फसवणूक करणाऱ्यांच्या पोलीस मागावर होते. अशातच पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्तालयातील सायबर पोलिसांनी आंतरराष्ट्रीय सायबर फ्रॉड सिंडिकेट मधील एका मुख्य मोहरक्याला आणि त्याच्या इतर सहकारी गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या आहेत.

वेगवेगळ्या वेबसाईटद्वारे तसेच व्हाट्सअप आणि टेलिग्रामद्वारे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यानंतर मोठ्या परतावा देण्याचे आमिष दाखविले जाते. हे आरोपी गुंतवणूकदारांना लाखो रुपयांचा आर्थिक गंडा घालत होते. तसेच आपल्या देशातील वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावाने तयार केलेले बँक खाते, बँक पासबुक, चेकबुक आणि एटीएम च्या साह्याने हे आरोपी गुंतवणूकदारांची कोट्यावधी रुपयाची आर्थिक फसवणूक करत होते.

पाचजण सायबर पोलिसांच्या ताब्यात

कंबोडिया देशातून ही टोळी अनेक भारतीयांना कोट्यावधी रुपयाचा आर्थिक गंडा घालत असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. सॅम ऊर्फ डेव्हिड उर्फ संबंधित कुमार श्रीपती नायक (वय २२, रा. जिल्हा राउलकिल्ला, राज्य ओडिशा) या आपल्या देशातील मुख्य आरोपीला आणि त्याच्या इतर पाच साथीदारांना पिंपरी-चिंचवडचे सायबर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. यामुळे अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे. 

टोळीवर देशभरात १०२ तक्रारी 

दरम्यान पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. मात्र या टोळीतील कंबोडिया देशातील मुख्य मोहरक्या अद्याप पोलिसांच्या हाती लागला नाही. त्याचा शोध पोलिसांकडून सुरु आहे. तर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीकडे मिळालेल्या बँक खात्या संदर्भात जवळपास १०२ तक्रारी संपूर्ण देशभरात दाखल असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: केंद्र सरकारचे बजेट हे अत्यंत निराशाजनक आणि हास्यास्पद - यशोमती ठाकूर

Bribery Case : पोलीस अधिकाऱ्याला ६ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं; लाचलुचपत विभागाची मोठी कारवाई

अजित पवारांचा अपघात की घातपात? राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केला संशय, राजकीय वर्तुळात खळबळ

Cancer Medicines: कॅन्सर पेशंटना नवसंजीवनी; जीव वाचवणारी १७ औषधं स्वस्त होणार, अर्थसंकल्पात मोठी घोषणा

...तर अजितदादा माझ्याशी बोलले असते; राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर CM फडणवीसांचं मोठं भाष्य

SCROLL FOR NEXT