Sanjay Raut Saam tv
महाराष्ट्र

Sanjay Raut : मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार; संजय राऊत यांचा दावा

Pimpri Chinchwad : संजय राऊत हे आज पुणे- पिंपरी चिंचवड शहर दौऱ्यावर आहेत. या दरम्यान त्यांनी चिंचवड विधानसभा क्षेत्राचे महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे यांच्या कार्यालयाला भेट दिली आहे

गोपाळ मोटघरे

पिंपरी चिंचवड : राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येणार आणि महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री होणार. या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला सध्या राज्यात १६० ते १६५ उमेदवार निवडून येत आहेत; असा दावा शिवसेने उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत (Sanjay Raut) हे आज पुणे- पिंपरी चिंचवड शहर दौऱ्यावर आहेत. या दरम्यान त्यांनी चिंचवड विधानसभा क्षेत्राचे महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे यांच्या कार्यालयाला भेट दिली आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत वक्तव्य केले आहे. मात्र विधानसभा निवडणुकीत सध्या जोरदार प्रचार सुरु असून निकालाबाबत महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) व महायुतीकडून दावा केला जात आहे. याच दरम्यान संजय राऊत यांनी मविआचा विजय याबाबत दावा केला आहे.  

चिंचवाडमध्येही विजय निश्चित 

राहुल कलाटे हे यापूर्वी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीला थांबले होते. मात्र या वेळी ते पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अधिकृत उमेदवार असल्याने चिंचवड विधानसभा निवडणुकीत त्यांचा विजय निश्चित आहे; असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

SCROLL FOR NEXT