Chinchwad Vidhan Sabha Saam tv
महाराष्ट्र

Chinchwad Vidhan Sabha : चिंचवड विधानसभेत बंडखोरी; भाजपने उमेदवार दिल्याने मित्र पक्षातील पदाधिकारी नाराज

Pimpri Chinchwad News : विधानसभा निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडी यांच्यात सरळ लढत पाहण्यास मिळणार आहे. मात्र अनेक ठिकाणी मित्र पक्षांकडून बंडखोरी करत आव्हान दिले जाणार असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.

गोपाळ मोटघरे

पिंपरी चिंचवड : विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी राजकीय पक्षांची सुरु आहे. अजूनही जागा वाटपाचा तिढा अनेक ठिकाणी पाहण्यास मिळत आहे. दरम्यान महायुतीत चिंचवड विधानसभेची जागा भाजपला सुटली आहे. भाजपने त्या ठिकाणी शंकर पांडुरंग जगताप यांना उमेदवार देखील घोषित केल्यामुळे आता महायुतीत बंडखोरीला सुरुवात झाली आहे.

विधानसभा निवडणुकीत (Vidhan Sabha Election) महायुती व महाविकास आघाडी यांच्यात सरळ लढत पाहण्यास मिळणार आहे. मात्र अनेक ठिकाणी मित्र पक्षांकडून बंडखोरी करत आव्हान दिले जाणार असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. त्यानुसार चिंचवड विधानसभा मतदारसंघात देखील अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून बंडखोरी करण्याचे संकेत आहेत. अजित पवार गटाचे नगरसेवक नाना काटे हे देखील बंडखोरीच्या तयारीत आहेत. नाना काटे हे चिंचवड विधानसभा निवडणूक लढवण्यावर  ठाम असून ते अगदी काही मिनिटांनंतर मुंबई येथे (NCP) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. 

शरद पवार गटाकडून उमेदवारीसाठी प्रयत्न 

चिंचवड विधानसभेसाठी शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळावी; यासाठी नाना काटे प्रयत्न करत आहेत. नाना काटे यांच्यासोबत अजित पवार गटाचे काही नगरसेवक आणि पदाधिकारी देखील आज शरद पवार यांना भेटणार आहेत. २०२३ च्या चिंचवड विधानसभा निवडणुकीत नाना काटे हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात थांबले होते. त्यावेळी त्यांनी भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांना कडव आव्हान दिलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT