Pimpri Vidhan Sabha  Saam tv
महाराष्ट्र

Pimpri Vidhan Sabha : विरोधानंतर २० बंडखोर नगरसेवकांचा अण्णा बनसोडेंना पाठींबा

Pimpri chinchwad News : २० नगरसेवकांपैकी तिन बंडखोर नगरसेवकांनी निवडणुकीच्या रिंगणात आपला उमेदवारी अर्ज देखील दाखल केला होता

गोपाळ मोटघरे

पिंपरी चिंचवड : पिंपरी विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार अण्णा बनसोडे यांना आज जवळपास २० बंडखोर नगरसेवकांनी पाठिंबा दिला आहे. यामध्ये विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या तीन उमेदवारावांचा देखील समावेश आहे. 

पिंपरी (Pimpri Chinchwad) विधानसभा क्षेत्रात अण्णा बनसोडे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात येऊ नये यासाठी त्यांच्याच पक्षातील आणि महायुतीतील इतर पक्षातील जवळपास २० नगरसेवकांनी शपथ घेऊन अण्णा बनसोडे यांना आपला प्रखर विरोध दर्शविला होता. त्या २० नगरसेवकांपैकी तिन बंडखोर नगरसेवकांनी निवडणुकीच्या रिंगणात (Vidhan Sabha Election) आपला उमेदवारी अर्ज देखील दाखल केला होता. मात्र नामांकन मागे घेण्याच्या अगदी शेवटच्या दिवशी या तीन बंडखोर उमेदवारांनी आपल्या इतर १७ बंडखोर नगरसेवकांसोबत अण्णा बनसोडे यांना पाठिंबा दर्शविला आहे.  

पिंपरी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार असलेले अण्णा बनसोडे यांना पाठींबा देणाऱ्या उमेदवारांमध्ये आरपीआयच्या चंद्रकांता सोनकांबळे, शिवसेना शिंदे गटाचे जितेंद्र जनावरे, अजित पवार गटाचे काळूरम पवार यांचा समावेश आहे. यातील आरपीआयच्या चंद्रकांत सोनकांबळे यांना महामंडळ देण्याचा शब्द उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Silver Rate Today: अर्थसंकल्पाआधीच गुडन्यूज! सोनं ₹१३००० तर चांदी २७००० रुपयांनी घसरली

Maharashtra Politics: भाजपचा हा सर्वात मोठा डाव, सुनेत्रा पवारांच्या शपथविधीनंतर बच्चू कडूंचं खळबळजनक विधान

Pakistan Blast : पाकिस्तान हादरले! १४ शहरात ४८ ब्लास्ट, १२० जणांचा मृत्यू, शेकडो गंभीर जखमी

Sangli Crime : पोटच्या मुलासमोरच वडिलांची दगडाने ठेचून हत्या; सांगलीत भररस्त्यात हत्याकांड

Budget 2026 Live Updates: अर्थसंकल्प सादर होण्याआधीच शेअर मार्केट धडाम! सेनसेक्स, निफ्टीमध्ये घसरण

SCROLL FOR NEXT