Fraud Case
Fraud Case Fraud Case
महाराष्ट्र

Fraud Case : दहा लाखाच्या चिल्ड्रन बँकेच्या नोटा देत फसवणूक; रक्कम तीन पट करण्याचे दिले आमिष

गोपाळ मोटघरे

पिंपरी चिंचवड : काही वेळातच तीन पट नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून दहा लाख रुपयाच्या चिल्ड्रन बँकेच्या नोटा देत फसवणूक (Fraud) करण्यात आली. या प्रकारात पिंपरी चिंचवड शहरातील एका हॉटेल व्यवसायिकाची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी (Police) पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Tajya Batmya)

शुभम भगवान सोनवणे असं फसवणूक झालेल्या हॉटेल व्यवसायिकाची नाव आहे. आकाश शेट्टी, सचिन नरवडे, तुषार टेके आणि (Pimpri Chinchwad) त्याच्या सोबतच्या दोन मित्रांनी शुभम सोनवणे या हॉटेल व्यावसायिकांची जवळपास दहा लाख रुपयांची फसवणूक केली आहे. तुला आम्ही अगदी काही दिवसांत तिन पट नफा मिळवून देतो; असं आमिष दाखवत आरोपींनी हॉटेल व्यवसायिक शुभम सोनवणे याची फसवणूक केली आहे. शुभम सोनवणे यांनी जेव्हा आरोपींकडे पैसे नफ्यासोबत परत करण्याची मागणी केली. तेव्हा आरोपींनी त्याला जवळपास दहा लाख रुपयांच्या चिल्ड्रन बँकेच्या खोट्या नोटा परत दिल्या आहेत. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दोन आरोपी ताब्यात 

नोटा भरलेली बॅग शुभम सोनवणे घरी गेल्यानंतर मोजू लागला. यावेळी त्याच्या लक्षात आलं की आरोपींनी त्याला चिल्ड्रन बँक खोट्या चलनी नोटा देऊन त्याची फसवणूक केली आहे. त्यानंतर शुभम सोनवणे यांनी निगडी पोलीस स्टेशनमध्ये संबंधित आरोपी विरोधात तक्रार दाखल केली. निगडी पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून दोन आरोपींना बेड्या ठोकले आहेत. तर उर्वरित आरोपीचा शोध निगडी पोलीस घेत आहेत. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : पुण्यात मतदानानंतर गुन्हेगारी वाढली; कोयता गँगकडून एकाची हत्या

Dance Viral Video: 'तेरे मेरे होंटो पें' रोमँटिक गाण्यावर काकींचा मनालीमध्ये जबरदस्त डान्स; ४० वर्षांनी पूर्ण केले स्वप्न; VIDEO VIRAL

Swati Maliwal Assult Case: स्वाती मालीवाल प्रकरण नेमकं काय, एफआयआरमध्ये नेमके कोणते आरोप केले?

Sangli News : कॅफे शॉपमध्ये अश्लील चाळे, शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तान संघटना आक्रमक; सांगलीतील ३ कॅफे एकापाठोपाठ एक फोडले

Anil Deshmukh News : शरद पवार थांबलेल्या हॉटेलमध्ये सुनील तटकरे येऊन गेले; अनिल देशमुख यांचा गौप्यस्फोट

SCROLL FOR NEXT