Pimpri Chinchwad Crime Saam tv
महाराष्ट्र

Pimpri Chinchwad Crime : प्रियकराचे धक्कादायक कृत्य; प्रेयसीच्या मित्राला गाडीने चिरडण्याचा प्रयत्न

Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवड शहरात काल मध्यरात्रीच्या सुमारास यशवंतनगर येथील शंकर चौधरी चौक परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे

गोपाळ मोटघरे

पिंपरी चिंचवड : प्रेयसी दुसऱ्या मुलासोबत बोलत आहे. याचा राग मनात धरून प्रियकराने धक्कादायक कृत्य केल्याचे समोर आले आहे. मनात राग धरून आपल्या प्रेयसीच्या मित्राच्या अंगावर चारचाकी वाहन चालवून त्याला चिरडण्याचा प्रयत्न केला आहे. यात सदर तरुण गंभीर जखमी झाला आहे. 


पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरात काल मध्यरात्रीच्या सुमारास यशवंतनगर येथील शंकर चौधरी चौक परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमध्ये सदरील मुलगा हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावरती पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वाय. सी. एम. रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. सुशील काळे असे अंगावर चारचाकी गाडी घालणाऱ्या माथेफिरू तरुणाचे नाव असून या (Crime News) अपघातात निलेश शिंदे हा तरुण गंभीर जखमी झाला आहे.  

पोलिसात गुन्हा दाखल 
आपली प्रेयसी निलेश शिंदे या तरुणासोबत बोलत उभी आहे. हे पाहून सुशीलला राग अनावर झाला. या रंगात सुशील काळेने चारचाकी गाडी निलेश शिंदे यांच्या अंगावर घालून त्याला चिरडून ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणात (Pimpri Chinchwad Police) पिंपरी पोलिसांनी सुशील काळे यांच्या विरोधात खूनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांनो हे काम लगेच करा, अन्यथा मिळणार नाही ₹२०००; पीएम किसान योजनेबाबत मोठी अपडेट

Maharashtra News Live Update: कांदिवली लिंक रोडवर प्रचंड वाहतूक कोंडी

Dhurandhar 2 : २० दिवसांनंतरही दीपिका पादुकोण गप्प का? रणवीर सिंहच्या 'धुरंधर'वरून ट्रोल करणाऱ्यांना दिलं सडेतोड उत्तर

IPL Points Table: MIचा दरारा गायब, राजस्थानच्या विजयानं पॉईट्स टेबलमध्ये मोठी उलटफेर; कोणत्या संघाला किती मिळाले पॉईट्स?

Pod Taxi Update: 40 kmph स्पीड, 6 सीटर, चालवायला ड्रायव्हरही नसणार; मुंबईत धावणार भारतातली पहिली पॉड टॅक्सी

SCROLL FOR NEXT