Pimpri Chinchwad Crime Saam tv
महाराष्ट्र

Pimpri Chinchwad Crime: खून करून मुंबईत जात बनला किन्नर; पोलिसांनी केली अटक

Pimpri Chinchwad : खून करून मुंबईत जात बनला किन्नर; पोलिसांनी केली अटक

गोपाल मोटघरे

Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवड शहरातील निमगाव परिसरातील जंगलात एका निष्पाप तरुणाचा (Crime News) खून केला. यानंतर मारेकरी फरार झाला होता. तो मुंबईमध्ये जाऊन किन्नर बनून रहायला लागला. शेवटी या मारेकऱ्याला (Pimpri Chinchwad) पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. (Maharashtra News)

रोहित नागवसे आणि गोरख जनार्दन फल्ले अशी मारेकऱ्यांची नाव आहेत. रोहित नागवसे आणि गोरख पल्ले यांनी सचिन हरिराम यादव या 19 वर्षाच्या तरुणाचा पिंपरी चिंचवडच्या निमगाव परिसरातील जंगलात दारू पाजून दगडाने ठेचून खून केला होता. रोहित नागवसे आणि गोरख फल्ले हे कर्जबाजारी झाल्याने त्यांनी सचिन हरिदास यादव यांच्या कुटुंबाला लुटण्याचा कट रचला  होता. त्यासाठी त्यांनी सचिन यादव याला निमगाव परिसरातील एका जंगलात नेऊन दारू पाजली होती. त्या ठिकाणी दारूच्या नशेत सचिन याचा दगडाने ठेचून खून केला होता. 

दोन्ही आरोपी ताब्यात 

खून केल्यानंतर रोहित नागवसे हा मुंबईत (Mumbai) जाऊन किन्नरची वेशभूषा धारण करून राहू लागला होता. तर गोरख फल्ले हा त्याच्या बीड येथील मूळ गावी पळून गेला होता. या प्रकरणात सचिन यादवचे वडील यांनी (Pimpri Chinchwad Police) महाळुंगे पोलीस स्टेशनमध्ये सचिन यादव हरवल्याची तक्रार दिली होती. या प्रकरणात पिंपरी चिंचवड शहर पोलिसाच्या गुन्हे शाखा एक पोलीस पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपास करून रोहित नागवसे आणि गोरख फल्लेला बेड्या ठोकल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Credit Card Rules: क्रेडिट कार्डच्या नियमात ५ मोठे बदल; १ एप्रिलपासून थेट तुमच्या खिशावर होणार परिणाम

Rajpal Yadav : तुरूंगाबाहेर येताच राजपाल यादवची नको ती मागणी, मुख्यमंत्र्यांना भेटून सगळे काही सांगणार

Maharashtra Live News Update : दहिसरहुन गुंदवलीला येणाऱ्या मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड

Bhiwandi : भिवंडीत गेम पलटणार? भाजपला मोठा धक्का; 10 नगरसेवक काँग्रेससोबत जाणार?

How To Make Face Toner At Home: चेहऱ्याला लावण्यासाठी घरीच फेस टोनर कसं बनवायचं?

SCROLL FOR NEXT