Pimpri chinchwad News Saam tv
महाराष्ट्र

Fraud Case : गुंतवणूक करण्याचे सांगत कोट्यवधी रुपयांची फसवणूक; दोन जण पोलिसांच्या ताब्यात

Pimpri chinchwad News : ऑनलाईन फसवणूक करण्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. तर काहीजणांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे सांगत चांगला मोबदला देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करण्यात आली आहे

गोपाळ मोटघरे


पिंपरी चिंचवड : व्हेंट्रॉस डॉट कॉम या वेबसाईटवर कोट्यावधी रुपये गुंतवणूक करण्यास लावून गुंतवणूकदारांची कोट्यावधी रुपयाची आर्थिक फसवणूक करण्यात आली होती. या प्रकरणी तपास सुरु असताना फसवणूक करणाऱ्या टोळीला पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या सायबर गुन्हे पोलिसांनी अहमदाबाद आणि मीरा-भाईंदर इथे जाऊन बेड्या ठोकल्या आहेत.

ऑनलाईन फसवणूक करण्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. तर काहीजणांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे सांगत चांगला मोबदला देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करण्यात आली आहे. अशाच प्रकारे पिंपरी चिंचवड शहरातील अनेकांना व्हेन्ट्रॉस डॉट कॉम या वेबसाईटवर गुंतवणूक करण्यास लावून फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर सायबर पोलिसांनी तपास करण्यास सुरवात केली होती. 

दोघेजण ताब्यात 
पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी तपास करताना दोन जणांना अहमदाबाद व मीरा- भाईंदर येथून ताब्यात घेतले आहे. यात मितेश राजू भाई व्होरा (वय ३४) आणि केपीन अजित कुमार मेहता (वय ४१) अशी पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आरोपीची नाव आहेत. या दोन्ही आरोपींनी मिळून म्युअल अकाउंट मधून गुंतवणूकदारांचे फसवणूक केलेले कोट्यावधी रुपये बाहेर काढले आहेत. 

फसवणुकीत आणखी काहीजणांचा सहभाग? 

दरम्यान फसवणूक झाल्याच्या गुन्ह्यात दोघेजण पोलिसांच्या ताब्यात सापडले असून फसवणूक करणाऱ्या आरोपींचे अजून काही साथीदार असल्याचा संशय सायबर पोलिसांना आहे. त्या दृष्टिकोनातून सायबर पोलीसांकडून दोघांची चौकशी करण्यात येत असून त्या अनुषंगाने पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: २०२६ की २०२७; कधी होणार आठवा वेतन आयोग लागू? केंद्र सरकारने स्पष्टच सांगितलं

Maharashtra Live News Update: छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो एलपीजी पंपासमोर ३ ते ४ किलोमीटरच्या रांगा

Mumbai : डोकं रिक्षावर आपटलं, फरफडत नेलं; ४ वर्षांच्या चिमुरड्याला अमानुष मारहाण, वसईचा व्हिडिओ पाहून काळजाचा ठोका चुकेल!

भोंदू बाबा अशोक खरातवर शिर्डीत गुन्हा दाखल; 4 एकर भूखंड बळकावला|VIDEO

Dhurandhar 2 Collection : जगभरात 'धुरंधर 2'चा धुमाकूळ; 1,400 कोटींच्या उंबरठ्यावर, रणवीर सिंहने रचला इतिहास

SCROLL FOR NEXT