Pimpri chinchwad News Saam tv
महाराष्ट्र

Pimpri Chinchwad News : भीती दाखवत ६८ जणांकडून लुबाडले लाखो रुपये; फसवणूक करणारी टोळी पिंपरी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात

Pimpri chinchwad News : पिंपरी चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या टोळीतील दोन संशयित आरोपी हे महाराष्ट्रातील तर दोन जण गुजरात राज्यातील आहेत

गोपाळ मोटघरे

पिंपरी चिंचवड : कस्टम डिपार्टमेंटमधून बोलतोय, तुमच्या नावाने कुरिअर आले असून त्यात अंमली पदार्थ, क्रेडिट कार्ड, पासपोर्ट आणि इतर बेकायदेशीर वस्तू आहेत. असं सांगून नागरिकांना घाबरवले जात होते. यानंतर त्यांच्याकडून लाखो रुपये लुबाडले जात होते. याबाबत प्राप्त तक्रारीवरून पिंपरी-चिंचवड शहर पोलिसांनी टोळीला बेड्या ठोकल्या आहेत.

हिंजवडी पोलीस स्टेशन हद्दीत राहणाऱ्या एका महिलेला फोन करून तिला आम्ही कुरियर कंपनी आणि कस्टम डिपार्टमेंटमधून बोलत असल्याचे सांगत तुमच्या नावाने एक कुरियर आले आहे. त्यात अंमली पदार्थ, क्रेडिट कार्ड आणि पासपोर्ट असल्याचे सांगत महिलेला जवळपास २५ लाख रुपयांचा गंडा घातला. या संदर्भात तक्रारदार महिलेने हिंजवडी पोलीस (Police) स्टेशनमध्ये अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या सायबर सेलने (Fraud) तसेच हिंजवडी पोलिसांनी या चारही आरोपीचा तांत्रिक तपास करून बेड्या ठोकल्या आहेत.

बँक खात्यातून दोन कोटींचे व्यवहार 
पिंपरी चिंचवड पोलिसांनी (Pimpri chinchwad Police) ताब्यात घेतलेल्या टोळीतील दोन संशयित आरोपी हे महाराष्ट्रातील तर दोन जण गुजरात राज्यातील आहेत. स्वरूप अशोक खाबेकर आणि पुष्कर चंद्रकांत पाखले अशी महाराष्ट्रातील आहेत. तर मोनिक भरतभाई रंगोलीया आणि कौशिक मनसुखभाई बोरड अशी गुजरात राज्यातील आहेत. या चारही जणांनी मिळून आतापर्यंत जवळपास ६८ जणांची फसवणूक केली असून या संशयित आरोपींनी आपल्या बँक खात्यामध्ये दोन कोटी रुपयांपेक्षा जास्त फसवणुकीचे व्यवहार केले आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT