School CCTV Footage Saam TV
महाराष्ट्र

School CCTV Footage: शाळेत विद्यार्थ्यांच्या शौचालयात CCTV कॅमेरा; संतापजनक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

School Washroom CCTV Footage : शाळेत घडलेल्या या प्रकारामुळे पालकांनी शाळेविरोधात संताप व्यक्त केलाय. शाळेने असे करणे चूक आहे. विद्यार्थ्यांचे वॉशरुममधील व्हिडीओ व्हायरल झाल्याने त्यांच्या मनावर याचा परिणाम झाला आहे.

Ruchika Jadhav

गोपाळ मोटघरे

Pimpri-Chinchwad Crime News :

पिंपरी चिंचवड शहरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शहरातील जय हिंद हायस्कूलमध्ये शाळा प्रशासनाने थेट मुला-मुलींच्या वॉशरुममध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. या घटनेमुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या आधिक माहितीनुसार, विद्यार्थ्यांच्या सिक्युरिटीचे कारण देत आम्ही स्कूलच्या वॉशरूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असा दावा शाळा प्रशासनाने केला आहे. मात्र सेक्युरिटीचे कारण पुढे करत असताना मुलांच्या वॉशरुममधील प्रायव्हसीचा विसर जय हिंद स्कूल प्रशासनाला पडला आहे का? असा प्रश्न पालकांकडून उपस्थित केला जातोय.

जय हिंद स्कूलमधील मुला-मुलींच्या वॉशरुममध्ये सीसीटीव्ही लावल्यानंतर याचा एक फुटेज सोशल मीडियावर वायरल झालाय. त्यानंतर पिंपरी चिंचवड महापालिकेचे शिक्षण विभाग देखील खडबडून जागे झाले आहे.

शिक्षण अधिकाऱ्यांनी जय हिंद हायस्कूलमध्ये जाऊन गर्ल्स अँड बॉईज स्टुडन्ट टॉयलेटचे सीसीटीव्ही कॅमेरे लगेच काढले आहेत. तसेच या प्रकरणात स्कूल प्रशासनाला नोटीस देऊन या सर्व घटनेची चौकशी करणार असल्याची माहिती शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली आहे.

शाळेत घडलेल्या या प्रकारामुळे पालकांनी शाळेविरोधात संताप व्यक्त केलाय. शाळेने असे करणे चूक आहे. विद्यार्थ्यांचे वॉशरुममधील व्हिडीओ व्हायरल झाल्याने त्यांच्या मनावर याचा परिणाम झाला आहे. विद्यार्थ्यांना शळेत जाण्यासाठी मनात काहीशी भीती वाटत आहे. त्यामुळे सदर प्रकरणी योग्या ती कारवाई व्हावी अशी मागणी पालकांनी केलीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss : लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल; फक्त ३० दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल सडपातळ

Maharashtra News Live Update: दहीहंडीत अश्लील नृत्य; डान्सर निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

IAS Transfer : मोठा प्रशासकीय फेरबदल! २७ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

Gram Panchayat: ग्रामीण राजकारणात बदल! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सरपंचांचे अधिकार संपले?

SCROLL FOR NEXT