Pimpri Chinchwad Crime Saam tv
महाराष्ट्र

Pimpri Chinchwad Crime : पैशांसाठी चोरल्या दुचाकी, रिक्षा; १३ दुचाकींसह चोरटा पोलिसांच्या ताब्यात

Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरातील मेट्रो स्टेशन परिसरात गाड्यांचे हॅन्डल लॉक न लावता पार्क केलेल्या वाहनांची शंकर देवकुळे हा बनावट चावी लावून वाहन चोरी करत होता

गोपाळ मोटघरे

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरातुन दुचाकी आणि ऑटो रिक्षा चोरीच्या घटना वाढल्या होत्या. याबाबत सुरु असलेल्या तपासात पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा क्रमांक दोन पथकाने चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्याला मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे. 

शंकर भरत देवकुळे असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या चोरट्याचे नाव आहे. पिंपरी चिंचवड (Pimpri chinchwad) आणि पुणे शहरातील मेट्रो स्टेशन परिसरात गाड्यांचे हॅन्डल लॉक न लावता पार्क केलेल्या वाहनांची शंकर देवकुळे हा बनावट चावी लावून वाहन चोरी करत होता. चोरी केलेली वाहन पैसे मिळवण्यासाठी कमी शिक्षित असलेल्या लोकांना अल्प दरात विक्री करत असल्याचे पोलीस (Police) तपासात उघडकीस आले आहे.

७० चोरीचे गुन्हे दाखल 

दरम्यान शंकर देवकुळे या अटल चोरट्याच्या ताब्यातून पोलिसांनी १३ दुचाकी वाहन आणि दोन ऑटो रिक्षा जप्त केल्या आहेत. शंकर देवकुळे याच्यावर जवळपास ७० वाहन चोरीचे गुन्हे राज्यातील वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहेत. त्यात त्याने सर्वात जास्त वाहन चोरीचे गुन्हे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात केले आहेत.  

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कोकण किनारपट्टीवर मासेमारीला ब्रेक

HSRP Number Plate Update: ... तर तुम्हाला भरावा लागणार ₹१००० चा दंड, HSRP नंबर प्लेटवर मोठी अपडेट

एक रुपया खर्च न करता किडनी आणि लिव्हर होईल स्वच्छ; सकाळी रिकाम्यापोटी प्या 'हे' ड्रिंक

Feeling Cold All The Time: तुम्हाला सतत थंडी वाजते? ही आहेत ६ कारणं

Pratapgad Fort : मराठ्यांच्या पराक्रमाचा अजरामर इतिहास, प्रतापगड किल्ल्याचे जुने नाव काय?

SCROLL FOR NEXT