Pimpri Chinchwad Corporation Saam tv
महाराष्ट्र

Pimpri Chinchwad Corporation : पाच हजार अनधिकृत बांधकामावर बुलडोजर; पिंपरी चिंचवड महापालिकेची कुदळवाडी परिसरात कारवाई

Pimpri Chinchwad News : पिंपरी चिंचवड महापालिकेकडून अनधिकृत बांधकामावर कारवाई करत आहे. यात प्रामुख्याने कुदळवाडी परिसरात अनेक वर्षांपासून दुकान थाटलेल्या दुकानदारांवर कारवाई केली जात आहे.

गोपाळ मोटघरे

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरातील कुदळवाडी परिसरात पिंपरी चिंचवड महापालिका जवळपास पाच हजार अनधिकृत बांधकामांवर बुलडोजर मशीन लावून पत्राशीठ बांधकाम निष्कासणाची कारवाई करत आहे. शेकडो जेसीबी मशीन आणि बुलडोजर लावून तसेच मोठा फौज फाटा लावून महापालिका कुदळवाडी परिसरात व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना कायद्याचा धाक दाखवत कारवाई करत आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेकडून अनधिकृत बांधकामावर कारवाई करत आहे. यात प्रामुख्याने कुदळवाडी परिसरात अनेक वर्षांपासून दुकान थाटलेल्या दुकानदारांवर कारवाई केली जात आहे. जवळपास २५० एकरवरील १५०० पेक्षा जास्त व्यावसायिक प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड महापालिकेने जेसीबी आणि बुलडोजर मशीन लावून जमीनदोस्त केली आहेत. हि कारवाई अजून सुरूच राहणार आहे. 

कायद्याचा धाक दाखवून व्यवसाय संपुष्टात 

पिंपरी चिंचवड शहराला ऑटोमोबाईल आणि इंडस्ट्रियल हब अशी ओळख आहे. या इंडस्ट्रीमधून मोठ्या प्रमाणात स्क्रॅप निघत असतो. इंडस्ट्रीमधून निघणारा स्क्रॅप खरेदी करणारी आणि त्यावर प्रक्रिया करणारी सर्वात जास्त दुकाने ही कुदळवाडी परिसरात आहेत. मात्र महापालिका पिढ्यान पिढ्यापासून व्यापाऱ्यांना कायद्याचे धाक दाखवून त्यांचा व्यवसाय संपुष्टात आणत आहे. हे सर्व होत असताना पिंपरी चिंचवड शहरातील कोणत्याही राजकीय पुढार्‍याची या व्यावसायिकांना साधी साध देखिल मिळत नाही यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. 

सूडबुद्धीने कारवाई होत असल्याचे आरोप 

आमचा योग्य पुनर्वसन न करता महापालिका आमच्यावर तर सूडबुद्धीने कारवाई करत आहे. असा आरोप कुदळवाडी परिसरातील व्यापारी, व्यावसायिक करत आहेत. आम्हाला स्क्रॅप मॅनेजमेंट यार्ड उपलब करुन न देता आमच्यावर पिंपरी चिंचवड महापालिका सूड बुद्धीने कारवाई करत आहे; असा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT