Hidden costs of healthcare: Investigation reveals massive price inflation in everyday medicines. saam tv
महाराष्ट्र

औषधांच्या नफेखोरीतून रुग्णांच्या लुटीचं रॅकेट, 'साम इन्व्हेस्टिगेशन'मध्ये लुटारूंचा पर्दाफाश

Pharma Scam India Medicine Price Exposed: मेडिकल स्टोअर रुग्णांची कशी लूट करतायत त्याचा पर्दाफाश साम टीव्हीच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये करण्यात आलाय. मात्र हे इथंच थांबत नाही तर कंपनीत 40 पैशांना तयार होणारी गोळी रुग्णांना मात्र 5 रुपयांना घ्यावी लागते. हे लुटीचं रॅकेट कुणाच्या आशीर्वादानं सुरुये? त्यावरचा स्पेशल रिपोर्ट पाहूया 'ऑपरेशन औषध बाजार'

Bharat Mohalkar

साम टीव्हीनं ऑपरेशन औषध बाजारमध्ये मेडिकल स्टोअरच्या नफेखोरीचा पर्दाफाश केला... मात्र त्यानंतर साम टीव्हीच्या हाती आणखी धक्कादायक माहिती आली... औषधांच्या माध्यमातून रुग्णांच्या खिशावर दरोडा टाकणाऱ्या रॅकेटचा मार्केटमध्ये सुळसुळाट आहे... औषध कंपन्या ते पांढऱ्या कपड्यातील काही दलाल डॉक्टर गोचिडासारखं रुग्णांचं रक्त शोषून घेतायत.... त्याची माहिती मिळाली... आणि खात्री करण्यासाठी डोलो आणि टेल्मा नावाच्या ओषधाच्या किंमती काय आहेत हे जाणून घेण्यासाठी साम टीव्ही मेडिकल स्टोरवर पोहोचल...त्यावेळी चक्रावून टाकणारं वास्तव समोर आलंय..

फक्त एकच नाही तर वेगवेगळ्या मेडिकलमध्ये साम टीव्हीचे प्रतिनिधी पोहोचले...

यानंतर साम टीव्हीनं थेट मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षांना गाठलं.... त्यावेळी त्यांनी डोलो गोळीचा प्रवासच उलगडून सांगितलाय..

खरं तर एखादी गोळी कंपनीत अवघ्या 40 पैशांमध्ये निर्माण होते... मात्र ती घेण्यासाठी रुग्णांना तब्बल 5 रुपयांपेक्षा जास्त पैसे मोजावे लागतात...

औषधांच्या किंमतीतून नफेखोरी

एक गोळी 30 ते 40 पैशांना तयार होते.... त्यानंतर कंपनी वाहतूक, मार्केटिंग आणि स्वतःच्या नफ्यासह सुपर स्टॉकिस्टला 1 रुपये 7 पैशांपर्यंत पोहोचते... त्यानंतर सुपर स्टॉकिस्ट आपला नफा बाजूला काढून ती गोळी होलसेलरला 1 रुपया 11 पैशांना विकतो... तर ही गोळी रिटेलरला 1 रुपया 20 पैशांपर्यंत मिळते... मात्र हीच गोळी रुग्णाकडे पोचेपर्यंत 5 रुपयांची होते...दुसरीकडे हा नफा आम्ही सरकारच्या नॅशनल फार्मास्यूटिकल प्रायसिंग अथॉरिटीच्या नियमानुसारच घेतो, असं मेडिकल असोसिएशनचं म्हणणं आहे... मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी मदन पाटील यांनी एनपीपीएनं ठरवून दिलेल्या नफ्याच्या टक्क्यांचं गणितच मांडलंय..

अवघ्या 40 पैशांमध्ये बनणारी गोळी 5 रुपयांना विकली जात असेल... आणि 3 IV कॅन्यूला ही 23 रुपयांना होलसेलमध्ये मिळणारी सीरिंज हॉस्पिटल अटॅच मेडिकलमध्ये एमआरपीच्या नावानं 173 रुपयांना सरकारच्या आशीर्वादानं विकली जात आहे... त्यामुळे या रॅकेटमागे एनपीपीएचे अधिकारी आणि औषध कंपन्यांची अभद्र युती आहे का? औषधांच्या उत्पादन किंमतीपासून विक्रीपर्यंत हजारो टक्के नफा कमावला जात असेल तर या नफ्याचे वाटेकरी सरकारी अधिकारीही आहेत का? असा प्रश्न निर्माण झालाय.... त्यामुळे प्रचंड नफेखोरी करणाऱ्या या रॅकेटला चाप लावण्यासाठी सरकारनेच किंमतीचं आणि नफ्याचंही ठोस धोरण ठरवण्याची गरज आहे.... नाहीतर रुग्णांच्या लुटीतून कंपन्या आणि दलाल असेच गब्बर होत राहतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुधाचा की कोरा? वजन कमी करण्यासाठी कोणता चहा सर्वात फायदेशीर? Black Tea Vs Milk Tea Benefits

Maharashtra News Live Update: मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप, रिक्षा चालकांकडून प्रवाशांची लूट

'माझ्या मृत आईच्या दुःखाचा राजकीय बाजार मांडू नका!'; सुषमा अंधारेंवर खासदार आष्टीकरांचा पुत्र भडकला

Mowgli Girl: दहा वर्षांपूर्वी जंगलात सापडलेल्या ‘मोगली गर्ल’चा मृत्यू; १८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Frankie Recipe: लहानामुलांसाठी या विकेंडला घरच्या घरी बनवा टेस्टी फ्रँकी, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT