Satara Crime News, Phaltan Saam tv
महाराष्ट्र

Satara Crime News : मेंढपाळांना मारहाण, महिलेसह पाच जणांवर गुन्हा दाखल

फलटण शहर पाेलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ओंकार कदम

Phaltan News : शेतात मेंढरे चरायला गेल्याने मेंढपाळांना मारहाण केल्याची घटना फलटण येथे नुकतीच घडली आहे. या प्रकरणी फलटण शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पाेलिस संशयितांचा शाेध घेताहेत. (Maharashtra News)

या घटनेबाबत पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार धुळदेव (फलटण) या गावाच्या हद्दीत राहणारे काका लक्ष्मण विराट ठोंबरे, सोमनाथ साधू नरुटे, सुखदेव लक्ष्मण ठोंबरे, भाऊसाळा रामानुरूपे, दत्तात्रय रामा नरुटे, गणेश महादेव नरुटे (मुंडाळे, ता, बारामती) हे फलटण तालुक्यातील धुळदेव गावच्या हद्दीत असणाऱ्या कॅनाल वर मेंढरांना पाणी पाजून त्यांच्या पालाकडे निघाले हाेते. तेथे जात असताना जवळील शेतात मेंढ्या गेल्या.

तेथील एक पुरुष व एक महिलेने मेंढरांना दगडं मारली. तुमची काय असेल ती नुकसान भरपाई घ्या पण मेंढरांना मारू नका असे म्हटले. त्यानंतर संबंधितांनी फोन करुन आणखी तिघांना बोलवून घेतले. तेथेच सर्वांना दगडाने, काठीने मारहाण केली.

या घटनेत एक मेंढपाळ जखमी झाला आहे. याबाबत एक महिला व चार पुरुषांच्या विरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tyres Black Colour : वाहनांचे रंग आणि डिझाइन बदलते, मग टायर नेहमी काळ्या रंगाचेच का असतात? जाणून घ्या रंजक कारण

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देणार! महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आश्वासन

महायुतीत बंडखोरी? सामंतांच्या निकटवर्तीय नेत्यानं थोपटले दंड; शिक्षक मतदारसंघात भाजपला मोठा धक्का

Monday Horoscope : पैसा, करिअर आणि व्यवसायात मोठी संधी; ‘या’ 6 राशींचे नशीब उजळणार

तुम्हीही हेल्थ इन्शुरन्स घेतलाय? मग ही बातमी नक्की वाचा! 1 जानेवारीपासून नवा नियम येणार

SCROLL FOR NEXT