Ram Mandir- PFI Saam Tv
महाराष्ट्र

Ram Mandir : राम मंदिर बॉम्बने उडवण्याचा कट, पुन्हा उभारायची होती मशिद; PFI चे धक्कादायक मनसुबे उघड

अटकेत असलेल्या संशयितांनी परदेशात वास्तव्य केल्याचंही तपासात समोर आल्याची माहिती ATS ने न्यायालयात दिली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

>> अभिजीत सोनवणे

नाशिक : अयोध्येतील राम मंदिर (Ram Mandir) पॉप्युल फ्रंड ऑफ इंडिया अर्थात PFI च्या निशाण्यावर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ATS च्या चौकशीत ही बाब समोर आली आहे. अयोध्येतील राम मंदिर पाडून पुन्हा बाबरी मशिद उभारण्याचा PFI चा डाव होता. मात्र NIA, ATS आणि अन्य केंद्रीय तपास यंत्रणांनी मागच्या महिन्यात देशभरात एकाच वेळी अनेक ठिकाणी छापेमारी करून PFI च्या मुसक्या आवळल्याने मोठा घातपात टळला आहे.

अयोध्येतील राम मंदिर पुन्हा एकदा दहशतवादी संघटनांच्या रडारवर असल्याचं समोर आलंय. देशविघातक कारवाया आणि सामाजिक अशांतता निर्माण करण्याच्या आरोपाखाली पॉप्युलर फ्रंड ऑफ इंडिया अर्थात PFI च्या अटक करण्यात आलेल्या संशयितांच्या चौकशीतून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. PFI च्या मॉड्युलमध्ये २०४७ पर्यंत भारत देश संपूर्ण मुस्लीम राष्ट्र बनवण्यासह बाबरी मशिदीच्या जागी उभारण्यात येणारं राममंदिर पाडून पुन्हा तेथे मशिद उभारण्याचा डाव होता, असं चौकशीत समोर आलं आहे. अटकेत असलेल्या संशयितांनी परदेशात वास्तव्य केल्याचंही तपासात समोर आल्याची माहिती ATS ने न्यायालयात दिली आहे. (National News)

बंदी घातलेल्या ‘सीमी’च्या धर्तीवरच कामकाजाची पद्धत असलेल्या PFI वर २३ सप्टेंबरला देशभरात छापेमारी करण्यात आली. तर राज्यातील मालेगाव, पुणे, बीड आणि कोल्हापुरातून ५ जणांना अटक करण्यात आली होती. ATS ने अटक केलेल्या PFI च्या संशयितांपैकी अनेक जणांनी परदेश दौरे केले असून तिथं वास्तव्यही केलंय. त्यामुळे या संघटनेला परदेशातून मोठा आर्थिक फंड मिळत असावा अथवा संशयितांमध्येही आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय आहे.

तर संशयितांच्या हार्ड डिस्कमधूनही आणखी महत्वपूर्ण माहिती हाती लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे केवळ राम मंदिरच PFI च्या निशाण्यावर होते की देशभरात हल्ल्याचा आणखी मोठा कट PFI च्या डोक्यात शिजत होता? PFI च्या २०४७ मॉड्यूलमध्ये आणखी काय टार्गेट आहेत? असे अनेक प्रश्न अजून अनुत्तरित असून ATS च्या तपासातून लवकरच PFI चे सर्व मनसुबे उघड होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ऑनलाईन तक्रारी वेळेत न सोडवल्याने सोलापूर महापालिकेची 51 अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई

Thyroid symptoms: थायरॉईडची समस्या असेल तर अचानक पायांमध्ये दिसतील ही ६ लक्षणं

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाबाबत महत्वाची अपडेट, पगारासोबत HRA, भत्ते आणि पेन्शनमध्येही होऊ शकतात मोठे बदल

Costal Road: कोस्टल रोडच्या बोगद्यात धावत्या कारने घेतला पेट, परिसरात धुरांचे लोट; दोन्ही मार्गिका बंद केल्याने वाहतूक कोंडी| VIDEO

Panvel : पनवेलमध्ये भटक्या कुत्र्यांचा हैदोस, १० जणांवर हल्ला; ६४ वर्षीय व्यक्तीच्या डोळ्याचा घेतला चावा

SCROLL FOR NEXT