अकोल्यातील पठार नदीला आलेल्या पुरात एक जण वाहून गेला जयेश गावंडे
महाराष्ट्र

अकोल्यातील पठार नदीला आलेल्या पुरात एक जण वाहून गेला

अकोल्यातील अकोट तालुक्यात बुधवारी रात्री जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे पनोरी गावातील पठार नदी तुडुंब भरून वाहत आहे. याच पुराच्या पाण्यात एक इसम वाहून गेला आहे.

जयेश गावंडे

अकोला : अकोल्यातील अकोट तालुक्यात बुधवारी रात्री जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे पनोरी गावातील पठार नदी तुडुंब भरून वाहत आहे. याच पुराच्या पाण्यात एक इसम वाहून गेला आहे. या पाण्यात पनोरी गावातील एक व्यक्ती दनोरी येथे आपल्या मित्रासोबत गेला होता.

रात्री परत येताना पाण्यात अचानक वाढ झाल्याने नदीपात्रात उडी मारून गावात येण्याचा प्रयत्न त्या व्यक्तीने केला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. मुरलीधर आनंदराव बुटे (40) राहणार पनोरी असे वाहून गेलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याची माहिती गावातील नागरिकांना मिळताच त्यांनी नदी काठालगत शोध मोहीम चालू केली आहे मात्र अद्यापही वाहून गेलेल्या व्यक्तीचा शोध लागला नाही.

पनोरी गावात संततधार पाऊस सुरु असून नदीत आलेल्या पाण्याच्या जोरदार माऱ्याने दोन पनोरी गावातील पठार नदीवरील पूल जीर्ण झाला आहे. पनोरी गावातील पूल पन्नास वर्षापूर्वीचा असून हा पुल जीर्ण झाला असल्याने त्याच्या नव्याने बांधकामाची मागणी काही वर्षांपासून केली जात आहे.

मात्र शासन व लोकप्रतिनिधी त्याकडे सातत्याने दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केली आहे. वाढत्या पाण्यामुळे पनोरी गावातील पूल दरवर्षी पाण्याखाली जातो त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. रात्री घडलेली दुर्घटना देखील यामुळेच झाली असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या घटनेची माहिती समजताच परिसरातील दहीहंडा पोलिस व अकोटचे तहसीलदार यांनी घटनास्थळी तत्काळ भेट देऊन घटनेची माहिती घेतली.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आक्रमक; हेक्टरी 1 लाख, शेतमजुरांना 25 हजारांची मदतीची मागणी

Migraine Home Remedies: डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास होताच करा 'हे' ७ घरगुती उपाय; मिळू शकतो झटपट आराम

महाराष्ट्रात IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; 2 अधिकाऱ्यांची मंत्रालयातच नियुक्ती, कोणाला कुठे जबाबदारी?

Home Remedies : व्हाईट सॉक्स दिसतील एकदम नवीन! घाणेरडे मोजे स्वच्छ करण्याच्या सोप्या घरगुती टिप्स

Formal Pants For Woman: महिलांसाठी फॉर्मल पॅन्टचे 5 लेटेस्ट डिझाईन्स; ऑफिस लूकसाठी बेस्ट

SCROLL FOR NEXT