Chhatrapati Sambhajinagar Saam Tv
महाराष्ट्र

Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीस आयुक्तांची कार फोडली, नंतर आयुक्तालयाची काचही फोडली; VIDEO आला समोर

Chhatrapati Sambhajinagar Police: छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिस आयुक्तांची कार फोडल्याची बातमी समोर येत आहे. यावेळी पोलीस आयुक्तालयाच्या मुख्य दरवाजाही फोडण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

>> रामू ढाकणे

Chhatrapati Sambhajinagar Police News:

छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिस आयुक्तांची कार फोडल्याची बातमी समोर येत आहे. यावेळी पोलीस आयुक्तालयाच्या मुख्य दरवाजाही फोडण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. एक जण विटा घेऊन आयुक्तालयात आला होता. त्यानेच हा प्रकार केलं असल्याचं सांगण्यात येत आहे. या व्यक्तीने आपला संताप व्यक्त करत ही तोडफोड केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा व्यक्ती एका बॅगेत दोन विटा घेऊन आला होता. आधी त्याने आयुक्तालयाची मुख्य दरवाजाची काच फोडली. यानंतर त्याने आयुक्तांची गाडी फोडली. विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रकार पोलिसांच्या समोरच घडला आहे. चक्क पोलीस आयुक्तालय फोडण्यात आल्याने नागरिकांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहे.

माझे गुन्हे नोंदवून घेत नाही, असा या व्यक्तीचा राग होता, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. पोलीस आयुक्तांचीच गाडी आयुक्तालयात फुटत असेल तर सामान्य माणसांनी कोणाकडे आपल्या समस्या मांडायचा, पोलीस सुरक्षित नसतील तर तिथे सामान्यांचं काय? असाही प्रश्न निर्माण होतोय. दरम्यान, याप्रकरणातील आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, भरधाव ट्रक घरात घुसला

Influencer Anita Bishnoi: रडत लाईव्ह आली अन् उचललं टोकाचं पाऊल; इन्फ्लुएंसर अनीता बिश्नोईचा लाईव्हमध्ये आत्महत्येचा प्रयत्न

New Highway: २४२०० कोटींचा महामार्ग, ४ राज्यातून जाणार; मोदी सरकारचा मास्टरप्लान, कुणाला होणार फायदा?

एका महिन्यात कंबरेपर्यंत वाढतील तुमचे केस, हा देसी उपाय करून बघा

Shocking : नवी मुंबईत भयंकर घडलं! १७ वर्षीय दिव्यांग मुलीवर लैंगिक अत्याचार, पीडिता ४ महिन्यांची गरोदर

SCROLL FOR NEXT