Osmanabad News Saam Tv
महाराष्ट्र

फुकटच्या दारूसाठी कायपण! दारु लुटण्यासाठी तरुणांच्या तलावात उड्या

दारु पिशव्यात भरून तरुण घटनास्थळावरून पसार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

उस्मानाबाद - तुळजापूर-लातूर मार्गावरून दारुचे बॉक्स घेऊन काेल्हापूरकडे निघालेल्या एका ट्रकमचा पहाटे अपघात (Accident) झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक तलावात उलटला. यानंतर, काही तरुणांनी जीव धोक्यात लावात उड्या मारत मद्याचे दारुचे बॉक्स लुटण्याचा प्रयन्त केला. कर्नाटकातील (Karnataka) हुमनाबाद येथून दारुचे बॉक्स घेऊन एक ट्रक कोल्हापूरच्या दिशेने निघाला होता. चालक अनिल महादेव हिंगमिरे व क्लीनर रमेश भारत खडपिडे हे दोघे ट्रक तुळजापूरमार्गे नेत असताना सोमवारी (१७ जानेवारी) पहाटे पाचुंदा तलावानजीक चालकाचे नियंत्रण सुटले. (Osmanabad Accident News)

हे देखील पहा -

प्रसंगावधान राखून चालक आणि क्लीनरने ट्रकमधून बाहेर उडी घेतली. मात्र हा ट्रक तलावात पडला. दारुचा ट्रक पलटी झाल्याची माहिती पसरताच काही तरुण तिथे जमले आणि तलावात उड्या टाकून काही बॉक्स बाहेर काढले. दारु पिशव्यात भरून तरुण घटनास्थळावरून पसार झाले. दरम्यान, यामध्ये नेमके किती किमतीची दारू होती , हे अद्याप कळू शकले नाही.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan : बौद्धभूमी फाउंडेशन प्रकरणात मोठी अपडेट; श्रीकांत शिंदेंनी KDMC आणि MMRDA ला दिले सखोल चौकशीचे आदेश

कर्जमाफीच्या अटी, शेतकऱ्यांसाठी कटकटी; केवळ 17 लाख शेतकऱ्यांनाच संपूर्ण कर्जमाफी?

'मोदींचे सरकार जाणार, आणीबाणी येणार'; राहुल गांधींचा खळबळजनक दावा

Fact Check: शाहरूख खान कॉकरोच जनता पार्टीत जाणार? लवकरच पार्टी जॉईन करण्याची घोषणा?

फुले दिले की फुलेच मिळतात, कुणी टीका केली, तरी शांत राहायचं; जॅकी श्रॉफ असे का म्हणाले?

SCROLL FOR NEXT