Sharad Pawar And Ajit Pawar Meeting  Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: पवार काका-पुतण्या एकत्र; 'रयत'च्या बैठकीत काय घडलं? बैठकीतला किस्सा चर्चेत

Sharad Pawar And Ajit Pawar Meeting: साताऱ्यात रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीनिमित्तानं अजित पवार आणि शरद पवार एकत्र आले होते. यामुळे पुन्हा एकदा अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू झालीय.

Girish Nikam

आता बातमी रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीतील एका किस्स्याची. साताऱ्यात रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीनिमित्तानं अजित पवार आणि शरद पवार एकत्र आले होते. त्यावेळी तपशील शोधण्यासाठी काकांनी पुतण्याला मदत केली. पाहूया नेमकं काय घडलंय या रिपोर्टमधून.

ही दृश्ये बघा. सध्याच्या राजकारणातील बोलकी दृश्ये आहेत. साताऱ्यात रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीमध्ये पवार काका-पुतणे अगदी आजूबाजूच्या खुर्चीवर बसलेले दिसून आले. दोन्ही नेत्यांनी या बैठकीत एकत्र निर्णयही घेतले. एव्हढंच नाहीतर शरद पवारांनी अजितदादांना कागदपत्रातील महत्वाचे तपशील शोधून देण्यासाठी मदत केली.

रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीत संस्थेचं गेल्या वर्षीचं किती उत्पन्न होतं, याबाबत चर्चा सुरु असताना या बैठकीत अजित पवार यांना गेल्या वर्षाच्या उत्पन्नाची माहिती सदस्यांना देण्याची विनंती करण्यात आली. अजित पवार यांच्या हातामध्ये असलेल्या कागदपत्रांमध्ये त्याबाबतची तपशील होता. पण त्यांना तो मिळत नव्हता.

यावेळी शेजारी बसलेल्या शरद पवार यांनी त्यांना ते तपशील शोधून देण्यात मदत केली. शरद पवार यांनी यासाठी त्यांना कागदपत्रांवर बोट ठेवून मजकूर वाचायला सांगितला. यानंतर अजित पवार यांनी आकड्याचं वाचन केलं.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीनंतर जेष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात राजकीयदृष्ट्या मोठी दरी निर्माण झाली. मात्र दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार अशी चर्चा वारंवार होते असते. त्याला निमित्तही घडतंय. नुकतंच बीडमध्ये अजित पवार यांनी भरसभेत 'चुलत्याच्या कृपेने बरं चाललंय, असं विधान केल्यामुळं पुन्हा काका-पुतण्याच्या मनोमिलनाच्या चर्चा रंगली आहे.

अजित पवार यांचे धाटके चिरंजीव जय पवार यांचा साखरपुडा पार पडला. या कार्यक्रमात शरद पवार यांना गेटवरती घ्यायला अजित पवार गेले होते. लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांचा सुप्रिया सुळेंकडून पराभव. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत अजिदादांविरोधात युगेंद्र पवारांचा पराभव. या राजकीय संघर्षामुळे पवार कुटुंबात मोठी दरी निर्माण झाली होती. मात्र अशा प्रसंगामुळे पवार काका-पुतण्यांच्या कुटुंबातील गोडवा वाढवणार का, हाच खरा प्रश्न आहे. आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारण काय बदल होणार का ? ते पाहणं महत्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कॅप राऊंडबाहेर प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी अभाविपचे आंदोलन

Gold Rate: खरेदीची सुवर्णसंधी! आठवडाभरात सोनं ७००० तर चांदी १४००० रुपयांनी स्वस्त; वाचा सुवर्णनगरीतील आजचे दर

Lemon storage tips: लिंबू सुकू नयेत म्हणून ‘या’ पद्धतीने करा स्टोअर, महिनाभर राहतील फ्रेश

New Rule : 1 ऑक्टोबरपासून सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम! ATM ते LPG पर्यंत 5 नवे नियम लागू, वाचा सविस्तर

Car tyre replacement: किती किलोमीटर्सनंतर कारचे टायर बदलले पाहिजेत?

SCROLL FOR NEXT