Nana Patole : राज्य सरकार पवारांच नव्हे उद्धव ठाकरेंच - नाना पटोले
Nana Patole : राज्य सरकार पवारांच नव्हे उद्धव ठाकरेंच - नाना पटोले Saam TV
महाराष्ट्र

Nana Patole : राज्य सरकार पवारांच नव्हे उद्धव ठाकरेंच - नाना पटोले

अमोल कलये.साम टीव्ही रत्नागिरी

रत्नागिरी : राज्याचे सरकार हे अजित पवार यांचं नसून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा आहे अशी प्रतिक्रिया कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिली आहे. रत्नागिरी येथे आयोजित ओबीसींच्या (OBC) हल्लाबोल आंदोलनानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला. घोटाळे करण्याची मालिका कोणी सुरू केली? असा सवाल करत नाना पटोले यांनी सध्याच्या आरोप-प्रत्यारोपांना उत्तर न देता बगल दिली. भुकणाऱ्या कुत्र्यांच्या तोंडी आपण लागत नाही याचा अर्थ मी कुणाला कुत्रा म्हटलं असं होत नाही, असा अप्रत्यक्ष टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.

किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी कोर्लई गावात जाऊन ची आज पाहणी केली त्यात यांना मुख्यमंत्र्यांची घर दिसली का अशा चिमटा काढत नाना पटोले यांनी संजय राऊत यांचं समर्थन केलं. संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. ठराविक टाईम बॉन्ड मध्ये ही चौकशी झाली पाहिजे असे देखील नाना पटोले यांनी स्पष्ट केलं.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: विद्येच्या माहेरघरात चाललयं काय? 'काळी जादू घालवतो' म्हणत महिलेला घातला १५ लाखांचा गंडा; दोघांवर गुन्हा दाखल

Tabbu Debut Hollywood : तब्बू आता हॉलिवूड गाजवणार, अमेरिकन टीव्ही शोमधून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Today's Marathi News Live : मुंबईतील अनधिकृत होर्डिंग पाडणार, पालिका करणार कारवाई

PM Narendra Modi : गंगा नदीची पूजा, क्रूझ राईडचा आनंद; वाराणसीतून नरेंद्र मोदी आज भरणार उमेदवारी अर्ज

IPL 2024 Playoffs: क्रिकेट फॅन्ससाठी गुड न्यूज! CSK आणि RCB दोघंही जाऊ शकतात प्लेऑफमध्ये; वाचा समीकरण

SCROLL FOR NEXT