चार महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या प्राध्यापकाच्या पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या अभिजीत घोरमारे
महाराष्ट्र

चार महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या प्राध्यापकाच्या पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या

या प्राध्यापकांच्या पूर्व पत्नी अंकिताचे कोरोनामुळे (Corona) निधन झाले होते

अभिजीत घोरमारे

गोंदिया : गोंदिया जिल्हामधील (Gondia District) आमगाव तालुक्यातील ठाणा येथील 30 वर्षीय विवाहित महिलेने आपल्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घड़ली आहे. दिपा धर्मेंद्र मेहर वय 30 वर्ष असं मृतक विवाहितेचं नाव आहे. दिपा यांचा चार महिण्यापुर्वीच विवाह झाला होता आणि त्यांच्या अशा आत्महत्येन परिसरात खळबळ माजली आहे.

दीपाने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजलं नाही. दिपाचे चार महिन्यांपूर्वी लग्न प्राध्यापक धर्मेंद्र मेहर यांच्याशी लग्न झाले होते. प्राध्यापक धर्मेंद्र मेहर यांच्या पूर्व पत्नी अंकिताचे कोरोनामुळे (Corona) निधन झाले होते, त्यांच्या मागे एक मुलगी आणि एक मुलगा आहे.

मुलांच्या संगोपन करण्यासाठी ऑक्टोबरमध्ये धर्मेंद्र यांनी दिपाशी दुसरे लग्न केले. त्यांच्या संसाराला जेमतेम चार महिने झाले असतांना दिपाने आत्महत्या का केली हे मात्र गूढ कायम आहे. याबाबत अधिक तपास आमगाव पोलीस करीत आहेत.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fashion Tips For Women: ब्लाऊजशिवाय साडी नेसण्याच्या मॉडर्न स्टाईल; 5 हटके आणि स्टायलिश पॅटर्न्स

मला प्रचंड त्रास दिला जातोय, आता संयमाचा बांध तुटणार; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

Maharashtra News Live Update: महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पीक नुकसान पाहणी

रशियाचा युक्रेनमधील भारतीय औषध कंपनीवर हल्ला; 400 कोटी रुपयांचं नुकसान

Maharashtra Fort : घनदाट जंगलात ३२०० फूट उंचीवर वसलाय 'हा' ऐतिहासिक किल्ला, ट्रेकिंगसाठी नक्की जा

SCROLL FOR NEXT