amravati mumbai superfast amba express Saam Tv
महाराष्ट्र

Amravati : रेल्वे प्रशासनाने अंबा एक्सप्रेसबाबत घेतला 'हा' निर्णय; प्रवासी संघटना संतप्त

नवा निर्णय तातडीने रद्द करावा अशी मागणी प्रवासी संघाने केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

- अमर घटारे

Aamravati : अमरावती मुंबई सुपरफास्ट अंबा एक्सप्रेसच्या (amravati mumbai superfast amba express) स्लीपर कोच डब्यांना कात्री लागणार आहे. वातानुकूलित डब्यांची संख्या वाढविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला असून या निर्णयाला अमरावती शहर रेल्वे प्रवासी (rail passengers) संघाने विरोध केला आहे.

एक्सप्रेसच्या स्लीपर कोचला कात्री लावून अंबाएक्सप्रेसचे ९पैकी ७ स्लीपर कोच कमी करण्याचे षड्यंत्र असल्याने याला प्रवाश्यांनी विरोध केला आहे. या निर्णयामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड असंताेष निर्माण झाला आहे.

अमरावतीकरांसाठी अत्यंत महत्त्वाची व किफायतशीर असलेली अंबा एक्सप्रेस आवाक्यापलीकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमरावती वरून मुंबईकडे जाणाऱ्या लाखों सामन्य वर्गातील प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

त्यामुळे जैसे थे डबे ठेवावे अन्यथा रेलरोको आंदोलन करू असा इशारा प्रवासी महासंघाने दिला आहे. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lose Belly Fat : महागड्या डाएटशिवायही पोटावरील चरबी झपाट्याने होईल कमी, फक्त आठवडाभर करा 'हा' घरगुती उपाय

Abhijit Dipke Exclusive: भर मुलाखतीत अभिजीत दिपकेला अश्रू अनावर, मोदी सरकारच्या कोणत्या गोष्टीमुळे डोळ्यात आलं पाणी?

Maharashtra News Live: चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगरप्रिंट बघायचेत - राज ठाकरे

Rain Alert : भीमा-नीरा खोऱ्यात मुसळधार पाऊस; उजनी, वीर धरणांतून मोठा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

EPFO Update : PF धारकांसाठी मोठी खुशखबर! आता पीएफचे पैसे अवघ्या 2 दिवसांत खात्यात, UPI द्वारेही मिळणार रक्कम

SCROLL FOR NEXT