प्रवासी वाहतूक करणारी गाडी ४० फुट खोल दरीत कोसळून भीषण अपघात!  SaamTvNews
महाराष्ट्र

प्रवासी वाहतूक करणारी गाडी ४० फुट खोल दरीत कोसळून भीषण अपघात!

तीव्र उतारावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने ४० फुट खोल दरीत कोसळली.

दिनू गावित

नंदुरबार : शहादा तालुक्यातील नागझीरी गावाजवळ प्रवासी वाहतूक करणारी मॅक्स बोलेरो गाडी खोल दरीत कोसळल्याने कोठबांधणी येथील नऊ जण जखमी झाले असून अपघातात (Accident) दोन प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नंदुरबार (Nandurbar) जिल्हा रूग्णालयात पाठवण्यात आले आहे. उर्वरित जखमींवर म्हसावद ग्रामीण रूग्णालयात ऊपचार सुरू आहेत.

हे देखील पहा :

कोटबांधणी येथून मॅक्स बोलेरो गाडी क्र.एम.एच. ७३८९ ही प्रवासी वाहतूक करणारी गाडी शहादाकडे प्रवासी बसवून आणत असताना नागझीरी गावाजवळ उमरापाणी फाट्यालगत तीव्र उतारावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने ४० फुट खोल दरीत कोसळली. अपघाताची माहिती मिळताच म्हसावद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले होते. सदर अपघातात आबला नानका भील, टेंबलीबाई हेलक्या भील, पाण्या पाणसिंग शिंदे, सोन्या आबल्या भील, वसंतीबाई आबला भील, हिराबाई सोन्या भील, आपसिंग साव-या भील, लाडकीबाई आपसिंग भील, एकट्या अजय भील हे नागरिक जखमी झाले आहेत.

यांच्यापैकी दोन जण गंभीर जखमी असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रूग्णालयात (Hospital) पाठवण्यात आले आहे. किरकोळ जखमींवर म्हसावद ग्रामीण रूग्णालयात डॉ. अल्लउद्दीन शेख यांच्या मार्गदर्शनाखाली ऊपचार सुरू आहेत. गाडीचा चालक मंगलसिंग पाण्यासिंग भील रा. केलीखेत, ता.पानसेमल, जि. बडवाणी याच्याविरोधात म्हसावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस (Police) निरीक्षक निवृत्ती पवार करीत आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT