MSRTC , Parbhani Saam tv
महाराष्ट्र

MSRTC : महिला कंडक्टरला लाथा-बुक्यांनी मारहाण, प्रवाशावर गुन्हा दाखल

या घटनेचा तपास गंगाखेड पाेलिस ठाण्यातील कर्मचारी करीत आहेत.

राजेश काटकर

Parbhani Crime News : क्षुल्लक कारणावरून महिला वाहकाला प्रवाशाने मारहाण केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी परभणी जिल्ह्यात घडली. या प्रकरणी गंगाखेड पाेलिस ठाण्यात प्रवाशावर गुन्हा नाेंदविण्यात आला आहे. (Maharashtra News)

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार अहमदपूर आगाराची बस (एमएच 20 बीएल 2018) गंगाखेड मार्गे जात असताना कासारवाडी पाटीवर प्रवाशी असलेले बालासाहेब रामराव कदम यांनी बेल वाजवली. वाहक ठकुबाई आप्पासाहेब गुट्टे यांनी त्याबाबत कदम यांना विचारणा केली.

त्यावेळी कदम यांनी गुट्टे यांना लाथा-बुक्क्याने मारहाण केली. इतर प्रवाशांनी बालासाहेब कदम यांना आवरण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनाही त्यांनी मारहाण करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे चालकाने बस गंगाखेड ठाण्यात आणली. पाेलिस ठाण्यात गुट्टे यांनी हा सर्व प्रकार कथित केला. त्यानंतर बालासाहेब कदम यांच्यावर गुन्हा दाखल केल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : भीषण अपघात! ट्रॉली आणि पिकअपची जोरदार धडक; २ जणांचा जागीच मृत्यू

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! ३० ते ४० अतिरिक्त लोकल धावणार; रेल्वेचा मोठा निर्णय

Hair Conditioner: गणरायाच्या आवडत्या फुलांपासून बनवा घरगुती हेअर कंडिशनर; केस होतील मऊ आणि चमकदार

Misal Pav Recipe: रविवारी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा झणझणीत पुणेरी मिसळ, वाचा रेसिपी

Maharashtra News Live Update : बार्शी तालुक्यातील शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून केली आत्महत्या

SCROLL FOR NEXT