वाई-महाबळेश्वर रस्त्यावरील पसरणी घाट उद्या वाहतुकीसाठी बंद ओंकार कदम
महाराष्ट्र

वाई-महाबळेश्वर रस्त्यावरील पसरणी घाट उद्या वाहतुकीसाठी बंद

महाबळेश्वर-पाचगणीमध्ये पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात.

ओंकार कदम

सातारा: वाईहून पांचगणी- महाबळेश्वरकडे (Wai-Mahabaleshwar ) जाणारा पसरणी घाट रस्ता (Pasarni Ghat) बुधवारी (ता.३०) दिवसभर वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहणार असून येथील वाहतूक इतर मार्गाने वळविण्यात येणार आहे. महाबळेश्वर-पाचगणी या भागात पावसाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे या भागातील पसरणी घाटामध्ये दरडी कोसळन्याचे प्रमाण जास्त आहे.

तसेच घाटामध्ये डोंगरामधून रस्त्यावर पाणी येत असते त्यामुळे रस्त्यांची परिस्थिती अत्यंत खराब होत असते त्यातच काही ठिकाणी असणारे संरक्षक कठडे सुद्धा जीर्ण होऊन कोसळले आहेत या सगळ्याची डागडुजी करण्यासाठी हा घाट एक दिवस पूर्णपणे बंद असणार आहे. महाबळेश्वर-पाचगणीमध्ये पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात. परंतु, सध्या कोरोनामुळे (Coronavirus) सर्व ठिकाणी कडक निर्बंन्ध आहेत. त्यामुळे सध्या इथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या कमी आहे.

पसरणी घाटातील साखळी क्रमांक ६६ /०० ते ७०/०० मधील मोरी व संरक्षक भिंती अतिवृष्टीमुळे पडलेल्या आहेत. त्यामुळे सदरचा रस्ता वाहतुकीस धोकादायक झालेला असल्यामुळे त्याची दुरुस्ती करण्याचे काम प्रगतीपथात आहे. तरी हा रस्ता वाहतुकीस सुस्थितीत करण्यासाठी मोरीचे बांधकाम व संरक्षक भिंतीचे बांधकाम करण्यासाठी बुधवारी (ता.३०) सकाळी ६ ते सायंकाळी ६ पर्यंतच्या कालावधी साठी एक दिवसाकरीता रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

Kidney Health: राजमा खाल्ल्याने किडनी खरोखरच दुरुस्त होते का? 'हा' धक्कादायक खुलासा वाचून चकित व्हाल

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

SCROLL FOR NEXT