Nagpur Police संजय डाफ
महाराष्ट्र

नागपूरात आढळला युवतीचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह! (पहा Video)

नागपूरच्या वाडी पोलिस ठाण्यांतर्गत सुराबर्डी येथील निर्जनस्थळी 22 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेहाने खळबळ उडालीय.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

संजय डाफ

नागपूर : नागपूरच्या वाडी पोलिस ठाण्यांतर्गत सुराबर्डी येथील निर्जनस्थळी 22 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेहाने खळबळ उडालीय. मृतदेहाशेजारी पेट्रोलची रिकामी बाटली आढळल्याने आधी तिची हत्या करून नंतर तिला जाळलं असावं, असा अंदाज व्यक्त केला जातोय. (Nagpur Crime News)

निकिता चौधरी (वय 22) असे या युवतीचे नाव असून ती राणाप्रतापनगर पोलिस स्टेशन हद्दीतील रहिवासी असल्याचे समजते. ती एक खासगी कंपनीमध्ये कामाला होती. मंगळवारी ती कार्यालयात गेली. मात्र, घरी परतली नाही. त्यामुळं तिच्या घरच्यांनी राणाप्रतापनगर पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती.

दरम्यान, पोलीस तिचा शोध घेत असताना काल संध्याकाळी सुराबर्डी परिसरात रिकाम्या म्हाडा क्वार्टर समोरील मैदानात तिचा जळालेला मृतदेह एका गावकऱ्याला दिसून आला. पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. मृत तरूणी काम करत असलेली कंपनी आणि तिचे जळालेला मृतदेह सापडलेला सुराबर्डी परिसर बऱ्याच अंतरावर आहे. त्यामुळे तिला त्या ठिकाणी कोणी नेले? याचा शोध नागपूर पोलीस (Nagpur Police) घेत आहेत. पोलिसांनी तिच्या एका मित्राला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.

पहा व्हिडीओ-

तर, बुधवार रात्री तिचा मुतदेह आढळल्याने एकाच खळबळ उडाली. पोलिसांनी याबाबत प्राथमिक तपासात अकस्मात मृत्यूची नोंद केली असली तरी कुठल्या कारणांवरून ही हत्या केली, कुणी केली या दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

3–4 Gram Gold Mangalsutra Design: 3 - 4 ग्रॅममध्ये बनवा सुंदर आणि शाही सोन्याचे मंगळसूत्र; महिलांसाठी 5 ट्रेंडी डिझाईन्स

Garba Bindi Designs : गरब्यात सगळ्यांची नजर फक्त तुमच्यावरच! ट्राय करा 'या' ७ ट्रेंडी बिंदी डिझाइन्स

Maharashtra News Live Update: पुण्यात स्कूलबसच्या धडकेत मुलगा मृत्युमुखी,घोरपडी परिसरातील घटना

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅकआधी शरीर देतं हे ७ संकेत, जाणून घ्या

Gold Rate Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी सोनं झालं स्वस्त, १० तोळा ३३०० रुपयांनी घसरले; वाचा 18k- 22k आणि 18k चे दर

SCROLL FOR NEXT