parli shivraj divate case  Saam Tv News
महाराष्ट्र

Shivraj Divate Case: शिवराज दिवटे मारहाण प्रकरणाच्या निषेधार्थ परळी बंद, पालकमंत्री बीडमध्ये; तणावाचं वातावरण

Parli Shuts Down in Protest Over Shivraj Divate Assault: शिवराज दिवटे मारहाण प्रकरणात परळी बंदची हाक देण्यात आली आहे. शिवराजला न्याय मिळावा अशी मागणी परळीच्या नागरिकांनी केली आहे. आज पालकमंत्री अजित पवार देखील बीड दौऱ्यावर आहेत.

Priya More

योगेश काशिद, बीड

बीडच्या परळी येथील जलालपूरमध्ये शिवराज दिवटे या तरुणाला १० ते १५ जणांच्या टोळीने अमानुष मारहाण केली होती. या घटनेचे तीव्र पडसाद बीडमध्ये उमटत आहेत. आज राज्याचे उपमुख्यमंत्री बीड जिल्हा दौऱ्यावर येत असून ते परळी येथील श्री. प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेऊन विकास कामांचा आढावा घेणार आहेत. मात्र दुसरीकडे शिवराज दिवटे तरुणाला मारहाण या घटनेच्या निषेधार्थ आज मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने परळी शहर बंदची हाक देण्यात आली आहे. अजित पवार यांच्या दौरा आणि दुसरीकडे परळी शहर बंदमुळे तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे.

परळीच्या लिंबोटामध्ये राहणारा शिवराज दिवटे या तरुणाचे शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता पेट्रोल पंपासमोरून अपहरण करण्यात आले होते. जलालपूर भागातील डोंगरपट्ट्यात असलेल्या रत्नेश्वर मंदिर परिसरात नेऊन शिवराजला १० ते १५ जणांच्या टोळीने लाठ्याकाठ्या आणि बेल्टने अमानुष मारहाण केली होती. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या मारहाणीत हा तरुणी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सांप्रदायिक कार्यक्रमाच्या जुन्या वादावरून या शिवराजला मारहाण करण्यात आली होती.

समाधान मुंडे आणि त्याच्या इतर साथीदारांनी शिवराज दिवटेला मारहाण केली होती. शिवराज दिवटे या तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी परळी पोलिसांनी सात आरोपींना अटक केली. तर इतर आरोपींचा शोध सुरू आहे. समाधान मुंडेच्या टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई करा या मागणीसाठी लिंबोटा गावचे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. रविवारी सकाळी बीड-परळी मार्गावर ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. शिवराज दिवटे मारहाण प्रकरणी परळी बंदची हाक देण्यात आली आहे. शांततेच्या मार्गाने शिवराज दिवटे याला न्याय मिळाला पाहिजे हीच आमची भूमिका आहे, असे गावकऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार परळीमध्ये दाखल झाले. प्रभू श्री वैद्यनाथाच्या प्रवेशद्वारावरती दाखल श्री प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेताना त्याचबरोबर त्यांच्यासोबत मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार धनंजय मुंडे हे देखील आहेत. अजित पवार यांच्या हस्ते श्री प्रभू वैद्यनाथाचा दुग्ध अभिषेक करण्यात आला. यावेळी त्यांनी महापूजा देखील केली.यावेळी श्री प्रभू वैद्यनाथ देवस्थानाचे पुजारी यांच्या हस्ते अजित पवारांचे स्वागत करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT