parinay phuke, vijay wadettiwar, OBC Reservation saam tv
महाराष्ट्र

OBC Reservation : 'पटाेले, वडेट्टीवार वात्रटासारखं बोलून महाराष्ट्रचे वातावरण दूषित करताहेत'

वात्रट सारख बोलून महाराष्ट्रचे वातावरण दूषित करण्याच काम दाेघे करत आहेत असा टाेला परिणय फुकेंनी पटाेले आणि वडेट्टीवार यांना मारला.

Siddharth Latkar

- शुभम देशमुख

Bhandara News : विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी समाजाची वकिली करू नये, ओबीसी समाजात कोणती नावे टाकावे किंवा टाकू नये अशी कोणतीही भूमिका घेऊ नये जर त्यांनी पुढील काळात ओबीसी यांच्याबाबत काही व्यक्तव्य केली तर आम्ही ओबीसी समाजाच्या वतीने त्यांच्या विराेधात मोर्चा काढू असा इशारा माजी आमदार परिणय फुके यांनी वड्डेटीवार यांनी दिला आहे. (Maharashtra News)

विराेधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी जालना येथे जरांगे पाटलांची भेट घेतली. मराठा समाजाला कुणबी सर्टिफिकेट देण्यात याव आणि दुसरं म्हणजे मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण देण्यात यावं या दोन्ही मागण्यांना वडेट्टीवार यांनी समर्थन दिले.

विजय वडेट्टीवार हे खरंच ओबीसी समाजाचे नेते असतील तर हे कधीच बोलले नसते असे परिणय फुके यांनी पत्रकार परिषदेत नमूद केले. तसे वडेट्टीवार हे ओबीसी आहेत की नाही याबद्दल मला शंका आहे असेही त्यांनी नमूद केले.

मला त्यांची कास्ट सर्टिफिकेट बघावी लागणार कारण ओबीसी समाजाचा नेता अशा प्रकारचे व्यक्तव्य कधीच करू शकत नाही असा दावा फुके यांनी केला. ओबीसी आणि मराठ्यांचे भांडण लावण्याचे काम विजय वडेट्टीवार करीत आहेत असा गंभीर आराेप वडेट्टीवार यांच्यावर परिणय फुके यांनी केला.

मराठा विरुद्ध ओबीसी वाद निर्माण करून भाजपाला महाराष्ट्राचे मणिपूर करायचे आहे या नाना पटाेलेंच्या वक्तव्यावर परिणय फुके यांनी वडेट्टीवार आणि पटोले यांच्यात स्पर्धा सुरु आहे. कोण जास्त मीडियावर येणार याची.

वात्रट सारख बोलून महाराष्ट्रचे वातावरण दूषित करण्याच काम दाेघे करत असून त्यावर बाेलून माझा आणि महाराष्ट्राचा वेळ म्ला वाया घालावा असे वाटत नाही असे माजी आमदार परिणय फुके यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बोगस रेशनकार्डचं रॅकेट, मुंबई पोलिसांची धडक कारवाई; 7 जण अटकेत, बांगलादेशी कनेक्शनचा संशय?

Maharashtra Live News Update: लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने ज्वेलर्स व्यावसायिकाकडे २० लाखांची खंडणी

इफ्तार पार्टीत सूटमुळे मिळेल परफेक्ट लूक; पाहा सूटचे ८ ट्रेंडी डिझाईन्स

पालघरमध्ये अपघाताचा थरार; भरधाव पिकअपने चिरडल्याने २ महिलांचा जागीच मृत्यू

छगन भुजबळ राज्यसभेवर जाणार होते, अजित पवारांची होती इच्छा; बड्या नेत्याचा गौप्यस्फोट

SCROLL FOR NEXT