nashik news, school, students saam tv
महाराष्ट्र

School Reopen : ए आई मला शाळेत जाऊ दे... नाशकात पालकांचा मुलांसह शाळेच्या बाहेर ठिय्या, निरागस बालकांनी रस्त्यावरच बसून खाल्ला टिफिन

शाळा व्यवस्थापनाने तातडीने याेग्य निर्णय घ्यावा अशी अपेक्षा पालकांनी व्यक्त केली आहे.

Siddharth Latkar

- तबरेज शेख

Nashik News : नाशिक शहरातील भोसला स्कूलच्या शिशु विहार शाळेत आज (गुरुवार) शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थी आणि पालकांवर आंदोलनाची वेळ आली. विद्यार्थ्यांना मोडकळीस आलेली इमारत दिल्याने पालक आक्रमक झाले. त्यांनी विद्यार्थ्यांसह शाळेच्या प्रवेशद्वारा बाहेर ठिय्या मांडला. (Maharashtra News)

उन्हाळी सुटी नंतर आजपासून महाराष्ट्रातील नव्या शैक्षणिक वर्षास प्रारंभ (maharashtra school reopens today) हाेत आहे. राज्यभरातील शाळांची आज सकाळी ७.३० वाजताच घंटा वाजली आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी अनेक शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा केला जात आहे. दरम्यान नाशिक शहरात असुविधांमुळे पालकांनी भाेसला शाळेच्या बाहेर आंदाेलन पुकारले आहे.

भाेसला स्कूलच्या शिशू विहार आणि बालक मंदिर (nashik news) या शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर आंदाेलनास बसलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी साम टीव्हीशी संवाद साधताना विद्यार्थ्यांच्या फी मध्ये इमारत शुल्क घेऊनही विद्यार्थ्यांना नवीन इमारतीत बसविले नाही अशी खंत व्यक्त केली. यावेळी पालकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. या शाळेचे सुरक्षा रक्षक आले असता त्यांना पालकांनी हुसकावून लावत जे याेग्य निर्णय घेऊ शकतात त्यांच्याशी आम्ही चर्चा करु असे सुनावले.

शाळा प्रशासनाने दिलेली इमारत विद्यार्थ्यांसाठी धोकादायक असल्याने नवी इमारत देण्याची मागणी पालकांनी केली. राज्यात एकीकडे विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत होत असताना दुसरीकडे भोसला स्कूल मधील विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी असुविधांमुळे पालकासमवेत आंदोलनास बसावे लागले. यावेळी पालकांनी चिमुकल्यांना त्यांचा डब्बा शाळेच्या बाहेरच खाऊ घातला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live: त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरी पर्वताखालील जांबाची वाडी धोक्यात, जमिनीला पडू लागल्या भेगा

स्लिव्हलेस ब्लाऊजच्या लेटेस्ट 5 डिझाईन्स; लग्न, पार्टी लूक दिसेल एकदम भारी

Aadhaar Card : आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झालं आणखी सोपं! नवीन Aadhaar App वरून घरबसल्या करा अर्ज, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Raj Thackeray: १२ वर्षात तुम्ही जे पेरलंय तेच उगवलंय; राज ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात

PM Kisan Yojana : PM किसान योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय! २०३० - ३१ पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला येणार ६,००० रुपये

SCROLL FOR NEXT