Parbhani : ट्रॅक्टर-दुचाकी अपघातात एक ठार, एक जखमी; ऐन पाडव्यादिवशी काळाचा घाला SaamTvNews
महाराष्ट्र

Parbhani : ट्रॅक्टर-दुचाकी अपघातात एक ठार, एक जखमी; ऐन पाडव्यादिवशी काळाचा घाला

पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा करून ट्रक्टर चालकाचा शोध सुरू केला आहे.

राजेश काटकर

परभणी : ट्रॅक्टर व दुचाकी अपघातात एक जण जागीच ठार झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना पाडव्याच्या दिवशी शनिवारी रात्रीच्या सुमारास सेलू (Selu) ते सातोना रस्त्यावर घडली. सेलू येथील सुनील अनंतराव राजवाडकर ( वय ५५ ) रा. ब्राह्मणगल्ली, सेलू व ऋषिकेश अंबादास नरळदकर (वय २२ ) रा. समतानगर, सेलू हे दुचाकीने (एम.एच. २० ए.व्ही. २३१४) वाकी येथून महादेवाचे दर्शन घेऊन सेलू येथे येत होते.

हे देखील पहा :

शनिवारी रात्रीच्या सुमारास सेलू येथून हादगाव पावडेकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रॅक्टरने (Tractor) या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात दुचाकी (Bike) ट्रॅक्टरखाली सापडली. अपघातात (Accident) सुनील राजवाडकर हे जागीच ठार झाले. तर ऋषिकेश नरळदकर हे गंभीर जखमी झाले. ग्रामस्थांनी मदतकार्य करत सेलु उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर जखमी ऋषिकेश नरळदकर यांना पुढिल उपचारासाठी परभणी (Parbhani) येथे हलविण्यात आले. पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा करून ट्रक्टर चालकाचा शोध सुरू केला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शरद पवार पुणे जिल्ह्यात करणार दुष्काळ दौरा

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT