Pune-bound travels bus accident in Parbhani Saam TV
महाराष्ट्र

Bus Accident : पुण्याकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सचा भयंकर अपघात, ४ जणांचा जागीच मृत्यू

Pune-bound travels bus accident in Parbhani : परभणी-पाथरी मार्गावर पुण्याकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सची दुचाकीला झालेल्या समोरासमोर धडकेत मानवत येथील चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला. या भीषण अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

Namdeo Kumbhar

Parbhani road Bus accident Death Toll : परभणी-पाथरी मार्गावर रात्री झालेल्या भीषण अपघातात मानवत येथील चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. परभणीकडून पुण्याकडे जाणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हल्सने दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. 'NL 01 B 1374' क्रमांकाची खासगी ट्रॅव्हल्स परभणीहून पुण्याकडे जात होती. दरम्यान, राहुल जिनिंगसमोर समोरून येणाऱ्या 'MH 22 BB 4724' क्रमांकाच्या दुचाकीला या ट्रॅव्हल्सची समोरासमोर जोरदार धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील चारही जणांचा जागीच मृत्यू झाला.

मृतांमध्ये शुभम आप्पाराव दहे (३०), विष्णू गोरे (२८), प्रल्हाद अशोकराव कुटे (२९) आणि नवनाथ शामराव जाधव (३८) या मानवत येथील रहिवाशांचा समावेश आहे. मानवत शहराजवळील राहुल जिनिंगसमोर रात्री साडेनऊच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण मानवत शहरावर शोककळा पसरली आहे.

अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षकांसह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतांना तातडीने मानवत येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती, मात्र पोलिसांनी तातडीने कार्यवाही करत वाहतूक सुरळीत केली.

सर्व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आले असून, एकाच शहरातील चार तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने मानवतसह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात विषारी दारूने घेतले १८ जणांचे बळी; बाहेरून 'गावठी' आणून 'मिथेनॉल' मिसळले

Mumbai CNG Price Hike : मुंबईकरांचं टेन्शन वाढलं! CNG आणि PNG च्या दरांमध्ये मोठी वाढ; जाणून घ्या ताजे दर किती?

Pravin Tarde : 'देऊळ बंद २'च्या धामधूमीत प्रवीण तरडेंची मोठी घोषणा; चाहत्यांना दिलं भन्नाट सरप्राइज, वाचा नेमकं काय म्हणालं?

Manoj Jarange : पुन्हा आंदोलनाची ठिणगी!रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील करणार आमरण उपोषण; नेमक्या मागण्या काय?

Today Horoscope : वृषभसह 'या' ३ राशींना नशिबाची साथ; शनिवार ठरणार आनंदाचा, प्रत्येक कामात मिळणार यश

SCROLL FOR NEXT