Parbhani News Saam tv
महाराष्ट्र

Parbhani News : आरक्षण मिळेपर्यंत बिल न भरण्याचा इशारा; रिमायंडर कॉलवर आंदोलकाची भूमिका

Parbhani News : आरक्षण मिळेपर्यंत बिल न भरण्याचा इशारा; रिमायंडर कॉलवर आंदोलकाची भूमिका

राजेश काटकर

परभणी : मराठा आरक्षण मिळविण्यासाठी मराठा समाज आंदोलन करताना काहीही करायला तयार आहे. (Parbhani) यात आता आरक्षण मिळेपर्यंत वीज बिल न भरण्याचा इशारा महावितरणला (Mahavitaran) दिला आहे. बिल भरण्याबाबत आलेल्या रिमायंडर फोन कॉलवर बोलताना हा इशारा दिला असून याचा ऑडिओ व्हायरल झाला आहे.

मराठा आरक्षणाची दाहकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. परभणी जिल्ह्यात रोज वेगवेगळी आंदोलने होताना दिसून येत आहेत. आतापर्यंत महावितरणने ग्राहकांना अनेक शॉक दिलेत, पण मराठा आरक्षणाचा (Maratha Aarkshan) शॉक महावितरणला बसत आहे. जिल्ह्यात महावितरणने थकीत बिलांची वसुली सुरू केली आहे. महावितरणची पथके घरोघरी जात बिल वसुली करत आहेत. बिल न भरलेल्या थकबाकीदारांची लाईट कट  करण्यापूर्वी पथकाकडून कॉल केले जात आहेत.  

फोन केला व मिळाला इशारा 

याच दरम्यान महावितरण (MSEDCL) अधिकाऱ्यांनी मराठा ग्राहक असलेल्या रवी मोगल यांना रीमायनडर फोन कॉल केला. यावेळी 'आम्ही आरक्षण मिळेपर्यंत कोणतेही बिले भरणार नाहीत व शासनाला तुम्ही कळवा.' असा इशारा रवी मोगल या दिला ग्राहकाने दिला आहे. ही ऑडियो क्लिप जिल्हाभरातील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weather Update : महाराष्ट्राला पाऊस झोडपणार, पुढील ३ तास महत्त्वाचे; कोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट?

Maharashtra News Live Update: भोंदू अशोक खरात याला आज कोर्टात हजर करणार

Strong Hair Tips: उन्हाळ्यात मजबूत केसांसाठी फॉलो करा या 5 सोप्या टेप्स

Vidhan Parishad Election 2026: विधान परिषदेसाठी भाजपकडून हालचालींना वेग, ३० जणांची नावं दिल्ली दरबारी; या नेत्यांच्या नावाचा समावेश?

Friday Horoscope: या राशींच्या आज मनातील इच्छा होतील पूर्ण; वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT