Parbhani News Saam tv
महाराष्ट्र

Parbhani News: शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर रास्ता रोको; गंगाखेड रोडवर वाहतूक खोळंबली

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर रास्ता रोको; गंगाखेड रोडवर वाहतूक खोळंबली

राजेश काटकर

परभणी : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर कॉम्रेड राजन क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघर्ष (Parbhani) समितीच्यावतीने आज (२३ ऑगस्ट) ब्राम्हणगाव फाटा येथे रास्ता रोको आंदोलन केले. शेतकऱ्यांच्या (Farmer) विविध प्रश्नांवर हे आंदोलन करण्यात आले असून आंदोलनामुळे रस्त्यावर वाहतूक खोळंबली होती. (Tajya Batmya)

जिल्हा प्रशासनास पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत. परभणी जिल्ह्यात ७० टक्के पेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, पीकविमा २५ टक्के अग्रीम मदत तात्काळ शेतकऱ्यांना द्या, जायकवाडीतील पाण्याचे परभणी जिल्हासाठी रोटेशन वाढवा. पीक कर्जाचे पुनगठन करून पीक कर्ज वाटप करा.  

कांदा अनुदान रक्कम कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तात्काळ अदा करा, मॊजे बाभूळगाव शिवारात घनकचरा प्रकल्प उभारण्यात येऊ नये; यासह अन्य विविध मागण्यासाठी शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शेतकरी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या रास्ता रोको आंदोलनामुळे गंगाखेड- परभणी रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाल्याने गंगाखेड परभणी रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blood pressure medicines: BP ची औषधं घेताय? मग या 7 चुका करणं आजच टाळा

Maharashtra News Live Update: नाशिकमधील आदिवासी आंदोलकांची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी घेतली भेट

देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावेत! राज्यातील बड्या नेत्याची इच्छा; राजकीय चर्चांना उधाण

बदल्यांचा धडाका सुरूच! 31 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलिस दलात मोठी खळबळ

Shocking: गेस्ट हाऊसच्या खोलीत ५ जणांचा संशयास्पद मृत्यू, एकाच कुटुंबातील सदस्यांसोबत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT