Parbhani News Saam tv
महाराष्ट्र

Parbhani News : मध्यरात्रीच्या सुमारास घराला आग; परिवार थोडक्यात बचावला, एकजण गंभीर

Parbhani News : परभणी जिल्ह्यातील सोनपेठ शहरातील दहीखेड परिसरातील बालाजी कोंडीबा वाकडे यांच्या घराला आग लागली होती

राजेश काटकर

परभणी : परभणी जिल्ह्यातील सोनपेठ शहरातील दहिखेड येथे मध्यरात्रीच्या सुमारास अचानक शॉर्टसर्किटमुळे घराला आग लागल्याची घटना घडली. यावेळी घरात झोपलेल्या परिवार सुदैवाने बचावला आहे. मात्र या दुर्घटनेत एकजण गंभीर जखमी झाला आहे.

परभणी (Parbhani News) जिल्ह्यातील सोनपेठ शहरातील दहीखेड परिसरातील बालाजी कोंडीबा वाकडे यांच्या घराला आग लागली होती. मध्यरात्रीच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली. काही क्षणातच आगीचा मोठा भडका उडाला होता. घराला आग लागल्याचे परिसरात समजताच नागरिकांनी (Fire) आग विझविण्यासाठी धाव घेतली. काही वेळानंतर आग विझविण्यात यश मिळाले होते. दरम्यान आगीत नुकसान झाले असल्याने कुटुंब उघड्यावर आले असून शासनाने तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

आग विझविताना एकजण गंभीर 

घराला लागलेली आग विझविण्यासाठी गेलेले वैजनाथ कोंडीबा आव्हाड हे गंभीररीत्या भाजले गेले आहेत. त्यांना लागलीच प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी लातुर येथे पाठविण्यात आले आहे. दरम्यान आगीत घरातील संपूर्ण संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले असून यात अंदाजे तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सुनेत्रा पवारांवरील वक्तव्याचा काटेवाडीत निषेध; ग्रामस्थांचे जोडे मारो आंदोलन

Heart Attack - High BP : हार्ट अटॅक अन् हाय बीपीचा धोका कमी करण्यासाठी 'या' बिया ठरतील वरदान

इन्शुरन्स नसेल तर पेट्रोल-डिझेलही मिळणार नाही? सुप्रीम कोर्टाच्या 'या' नव्या नियमाने देशभरात खळबळ

Hair Dye: केमिकल डाय नको! केसांना द्या नैसर्गिक काळा रंग; चहापत्तीपासून घरच्या घरी तयार करा हेअर कलर

8th Pay Commission: डेटा गोळा करण्याची डेडलाईन संपली! तुमच्या पगारात किती वाढ होणार? समोर आली मोठी माहिती

SCROLL FOR NEXT