Parbhani News Saam tv
महाराष्ट्र

Parbhani News : मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट; गुन्हा दाखल

Parbhani News : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे; यासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे मागील दीड वर्षांपासून आंदोलन करत आहेत

राजेश काटकर

परभणी : मराठा आरक्षणासाठी लढा उभारणारे मनोज जरांगे पाटील यांच्यावर फेसबुकवर आक्षेपार्ह पोष्ट करून शिवीगाळ करण्यात आल्याचे समोर आले होते. या प्रकरणी पोस्ट करणाऱ्या अज्ञातावर जिंतूर पोलिसात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस तपस करत आहेत. 

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे; यासाठी संघर्ष योद्धा (Manoj Jarange Patil) मनोज जरांगे पाटील हे मागील दीड वर्षांपासून आंदोलन करत आहेत. त्यांचा आंदोलनास मराठा समाजाकडून पाठींबा मिळत आहे. दरम्यान आंदोलनास वाढता पाठिंबा पाहता सदरील आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांना विविध मार्गाने बदनाम करण्याचे प्रकार समोर येत आहेत. असाच प्रकार मागील चार- पाच महिन्यापासून (Maratha Aarkshan) ओबीसी समाज जिंतूर तालुका या फेसबुकवरून बदनामीकारक फोटो व मजकूर प्रसिद्ध करण्यात येत होते. यामध्ये मनोज जरांगे पाटील यांना शिवीगाळ करणे, फोटो मोर्फ करणे, यामुळे मराठा समाजाच्या भावना दुखावण्याचे काम सातत्याने चालू होते.  

हा सर्व प्रकार सुरु असल्याने दोन समाजात तेढ निर्माण करून दंगल घडवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. हा सर्व प्रकार लक्षात घेता संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब काजळे यांच्या फिर्यादीवरून ओबीसी समाज जिंतूर तालुका या फेसबुक पेज चालवणाऱ्या अज्ञात आरोपी विरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : भिमाशंकर सभामंडपाच्या मुकुटाची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रतिष्ठापना

Shahrukh Khan: गुटख्याच्या जाहिरातींवरून शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ अडचणीत; कार्टाकडून समन्स जारी

Mumbai News : शिवतीर्थच्या अंगणात पांढरी पट्टी! मनसे नेते संदीप देशपांडेंचा जैन समाजाला इशारा

Maharashtra Politics : शरद पवारांना केंद्रीय मंत्र्याची मोठी ऑफर; काँग्रेसमध्ये विलीनीकरण करण्याऐवजी भाजपसोबत येण्याचे आमंत्रण

Blood Pressure: BP च्या गोळ्यांमुळे किडनी खराब होते का? जाणून घ्या तज्ज्ञांनी सांगितलेली खरी माहिती

SCROLL FOR NEXT