Parbhani News Saam tv
महाराष्ट्र

Parbhani News: घराच्‍या मोकळ्या जागेत झोपल्‍याने परिवार बचावला; आगीत धान्‍य, रोख रक्‍कमेसह साहित्‍याचा कोळसा

घराच्‍या मोकळ्या जागेत झोपल्‍याने परिवार बचावला; आगीत धान्‍य, रोख रक्‍कमेसह साहित्‍याचा कोळसा

राजेश काटकर

परभणी : मध्यरात्रीच्‍या सुमारास घरात अचानक आग लागली. या आगीत कॉम्‍प्‍युटर, डिजिटल कॅमेरा, धान्य, कपडे तसेच रोख (Parbhani) रक्‍कम व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. यात शेतकऱ्याचे (Farmer) २ लाखाचे नुकसान झाले आहे. पांगरा येथील तरंगल शिवार शेतात ही घटना घडली. (Tajya Batmya)

पूर्णा तालुक्यातील पांगरा येथील रहिवासी शेतकरी जळबाजी माणिकराव ढोणे यांचे तरंगल शिवारात गट क्र ५५ मध्ये शेतजमीन आहे. शेतात मातीच्या भिंती रचून तयार केलेल्या टिन पत्रे असलेल्या घरात राहतात. दरम्‍यान मंगळवारी रात्री जेवण करुन उन्हाळ्याचे दिवस असल्याने उकाडा असल्यामुळे घरात न झोपता घराशेजारी रिकाम्या जागेत कुटुंबीयासह झोपले होते. मध्यरात्रीनंतर पहाटे तीनच्या सुमारास घरातून जळाल्याचा फटफट आवाज आल्याने जाग आली. यावेळी घरातून आगीचा लोळ दिसताच त्यांनी शेजारील शेतकऱ्यांना बोलावून घराचे दार उघडून लागलेली आग (Fire) पाणी टाकून विझवली.

दोन लाखाचे नुकसान

त्यानंतर घरात पाहिले असता आतमधील कॉम्‍प्‍युटरचा संच, टिव्ही, कपडे, गहू, ज्वारी, तांदूळ, डाळी, बॅगमधे ठेवलेली दहा हजार रुपयांची रोख रक्‍कम आणि तर जिवनावश्यक वस्तू, महत्त्वाचे कागदपत्रे आगीत जळून भस्मसात झाली. या सुमारे दोन लाख रुपयाचे आर्थिक नुकसान झाले. सदरील आग ही अचानक लागून शेतक-याचे मोठे आर्थिक नुकसान झाले. दरम्यान, घटनेची माहिती पांगरा सज्जाचे तलाठी यांना दिली. घटनास्थळाची तात्काळ पाहणी करुन सबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली असून नुकसान भरपाई मिळण्याची मागणी करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG, 1st ODI: भारतानं घेतला पराभवाचा बदला; गिल, अक्षर आणि 'सुंदर'च्या खेळीनं टीम इंडियाचा विजय

NDA मध्ये सामील होण्याच्या चर्चेदरम्यान जयंत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; भेटीमागील कारण काय?

MSRTC Bus Fire: खंडाळा घाटात धावत्या पुसद-अकोला एसटी बसला भीषण आग, चालकाच्या प्रसंगावधानाने वाचला 43 प्रवाशांचा जीव

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धडका; मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सचा परवाना रद्द

Strait of Hormuz : होर्मुझमध्ये आता 'ट्रम्प टॅक्स', जहाजांवर अमेरिका 20% शुल्क लावणार, इराणचा विरोध

SCROLL FOR NEXT