Bribe Trap Saam tv
महाराष्ट्र

Bribe Trap: महिला तलाठीने घेतली वीस हजाराची लाच; एसीबीच्‍या सापळ्यात अटक

महिला तलाठीने घेतली वीस हजाराची लाच; एसीबीच्‍या सापळ्यात अटक

राजेश काटकर

परभणी : सातबारा उताऱ्यावर जमिनीची नोंद करून फेरफार करण्यासाठी २० हजार रुपयांच्या लाचेची (Bribe) मागणी करणाऱ्या रुमणा सज्जाच्या तलाठी शिल्पा किशनराव घाटोळ लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या (ACB) सापळ्यात अडकल्या आहेत. त्यांच्या विरुध्द नवामोंढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े. (Live Marathi News)

लाचलुचपत विभागाला मिळालेल्‍या तक्रारीची पडताळणी केली असता तलाठी शिल्पा घाटोळ यांनी २० हजाराची पंचासमक्ष मागणी केल्याचे निष्पन्न झाले. तक्रारदारच्या आईस न्यायालयाच्या आदेशाने वडिलोपार्जित जमिनीचा हिस्सा मिळाला होता. त्या जमिनीच्‍या सातबारा उताऱ्यावर नोंद करुन फेरफार घेण्यासाठी तक्रारदाराने गंगाखेड तालुक्यातील रुमणा सज्जाचे तलाठी शिल्पा घाटोळ यांच्याशी संपर्क साधला.

मात्र तलाठी घाटोळ यांनी पंचासमक्ष २० हजार रुपयांची मागणी केली होती. पैशांची मागणी केली असल्याची तक्रार २१ मार्चला लाचलुचपत विभागाला आली होती. तक्रारीची पडताळणी केली असता २० हजाराची लाच घेतल्याचे पंचासमोर निष्पन्न झाले. यानंतर शिल्पा घाटोळ यांच्यावर परभणीच्या नवामोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला आह़े.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat Train Accident : मुंबईहून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा अपघात कसा घडला? कारण आलं समोर

Gold and Silver Prices: चांदी चकाकली! चांदीच्या दरात ३,५०० रुपयांची वाढ, सोनंही महागलं

LPG Cylinder Booking Rules: १ मे पासून एलपीजी बुकिंगचे नियम बदलणार, सिलिंडर डिलीव्हरीतही बदल होणार?

पोपट आता पाळीव नाही तर ‘वन्यजीव, 10 वर्षांच्या लढाईनंतर शेतकऱ्याला न्याय

अपात्र लाडकींचा आकडा 26 लाख? बोगस लाभार्थ्यांकडून 165 कोटी वसूल करणार, 30 एप्रिलपर्यंत ई-केवायसीची मुदत

SCROLL FOR NEXT