Maratha Aarkshan Saam tv
महाराष्ट्र

Maratha Aarkshan : आरक्षणासाठी बैलगाडी मोर्चा; जिंतूर तालुक्यात मराठा आरक्षण आंदोलन सुरूच

Parbhani News : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून सरसगट कुणबी प्रमाणपत्रे देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विविध आंदोलन करण्यात येत आहेत

राजेश काटकर

परभणी : मराठा आरक्षणासाठी आंदोलन उभारण्यात आले आहे. याबाबत निर्णय घेण्यासाठी (Parbhani) राज्य सरकारला २४ डिसेंबरची मुदत दिली आहे. मात्र आरक्षणासाठी (Maratha Aarkshan) मराठा समाजाने उभारलेले आंदोलन सुरूच आहे. या दरम्यान जिंतूर तालुक्यात बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. (Breaking Marathi News)

मराठा समाजाला ओबीसी (Maratha Reservation) प्रवर्गातून सरसगट कुणबी प्रमाणपत्रे देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विविध आंदोलन करण्यात येत आहेत. यामध्ये जिंतूर तालुक्यातील जवळपास ३० ते ३५ गावात साखळी उपोषण चालू आहेत. तर राजकीय नेत्यांना गावबंदी कायम ठेवण्यात आली आहे. जो पर्यंत निर्णय होणार नाही. तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार अशी भूमिका मराठा समाजाने घेतली आहे. या दरम्यान जिंतूर तालुक्यात मोर्चा काढण्यात आला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तहसीलदारांना दिले निवेदन 

परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील पाचेगाव, रेपा, मानधानी, पुंगळा, दौड,वसा या गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येत मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मागणीसाठी तब्बल १५ कीलोमीटर भव्य बैलगाडी मोर्चा काढला. हा मोर्चा काढत आरक्षण व इतर मागण्यांचे निवेदन तहसीलदारमार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena Live Update : विधीमंडळातील फुटीचे पडसाद मूळ पक्षात का उमटू शकत नाहीत?; न्यायमूर्ती बागचींच्या प्रश्नाने कोर्टात पुन्हा वाद पेटला

Maharashtra News Live Update : घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांचा आकडा ७ वर पोहचला

Weight Loss: ट्रेडमिल की बाहेर चालणे? वजन कमी करण्यासाठी जाणून घ्या कोणता पर्याय ठरेल अधिक फायदेशीर

Beauty Tips : मानेवर चामखीळ किंवा तीळ घाण दिसतोय? या घरगुती उपायांनी करा कायमचा उपाय

Janhvi Kapoor: अश्लील फोटोप्रकरणी जान्हवी कपूरला हाय कोर्टाचा दिलासा; पण, फॅन पेजेस ब्लॉक करण्यास नकार

SCROLL FOR NEXT