Parbhani News Saam tv
महाराष्ट्र

Parbhani News : विहिरीचे खोदकाम जेसीबीने; रोहयोच्या संतप्त मजुरांनी पंचायत समितीतच प्राशन केले किटक नाशक

Parbhani News : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मंजूर विहिरीचे खोदकाम सुरु करण्यात आले होते. मात्र हे काम रोहयोच्या मजुरांमार्फत न करता जेसीबीच्या साह्याने केले जात होते

राजेश काटकर

परभणी : रोजगार हमी योजनेअंतर्गत कामे करून मजुरांना काम दिले जात असते. परंतु या योजनेंतर्गत मंजूर असलेल्या (Parbhani) विहिरीचे खोदकाम मजुरांना लावून केले जात नव्हते. यामुळे संतप्त झालेल्या दोन मजुरांनी पंचायत समितीच्या कार्यलयातच विषारी कीटक नाशक प्राशन केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. 

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (Rojgar Hami Yojana) मंजूर विहिरीचे खोदकाम सुरु करण्यात आले होते. मात्र हे काम रोहयोच्या मजुरांमार्फत न करता जेसीबीच्या साह्याने केले जात होते. याबाबत विचारणा करून देखील हाताला काम मिळत नसल्याने संतप्त झालेल्या मानोली येथील दोघांनी पंचायत समिती कार्यालय मानवत येथे किटनाशक औषध प्राशन केल्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. सदाशिव शिंदे व सुरेश मांडे असे या दोघा मजुरांचे नावे आहेत.  

विषारी द्रव्य घेतल्याने दोघांना अस्वस्थ वाटत असल्याने त्यांच्यावर मानवत रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून पुढील उपचारासाठी परभणी रुग्णालयात नेण्यात आले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान गावाचे सरपंच, ग्रामरोजगार सेवक यांच्या अनागोंदी कारभाराला कंटाळून हे पाऊल उचलले असून यास सरपंच व ग्रामरोजगार सेवक जबाबदार असल्याचा आरोप दोघांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Scam : राज्यपालांच्या PA च्या नावाने रेल्वेच्या VVIP तिकिटांचा घोटाळा! 'लोकभवन'च्या बनावट लेटरहेडचा वापर; ७ जणांना अटक

PF Transfer : जुनं PF खाते बंद झालं? EPFO च्या नव्या पोर्टलमुळे अडकलेले पैसे, Active UAN मध्ये ट्रान्सफर करणं झाले जास्त सोपं

Maharashtra News Live Update:भिवंडी इमारत दुर्घटना; मुख्यमंत्री फडणवीसांची घटनास्थळी पाहणी, महापालिका आयुक्तांना तातडीच्या कारवाईचे आदेश

Lung cancer: तरूणांच्या शरीरात गपचूप घर करतो फु्फ्फुसांचा कॅन्सर; सुरुवातीची 5 लक्षणं वेळीच ओळखा

Vaidehi Parshurami: जांभळी साडी, नाकात नथ अन् कपाळावर चंद्रकोर; वैदेही परशुरामीचा मराठमोळा अंदाज

SCROLL FOR NEXT