accident 
महाराष्ट्र

जीप– कारची जोरदार धडक; तीन जण जागीच ठार, चार गंभीर

जीप– कारची जोरदार धडक; तीन जण जागीच ठार, चार गंभीर

राजेश काटकर

परभणी : पालम ते लोहा राष्ट्रीय मार्गावर पेठशिवणी गावानजीक भरधाव वेगाने जाणाऱ्या कार व जीपची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार झाले असून ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. (parbhani-news-accident-news-Jeep-car-crash-Three-killed-on-the-spot-and-four-seriously)

पालम ते लोहा राष्‍ट्रीय महामार्गावर दुपारी चारच्‍या सुमारास हा अपघात (Accident) झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी सुतगिरणीच्या समोर भरधाव वेगाने जाणाऱ्या कार व जीपची समोरा समोर जोरदार धडक झाल्याने अपघात झाला. अपघातातील जखमींना पेठशिवणी येथील नागरिक व प्रवाशी यांनी धाव घेत जखमींना उपचारासाठी मदत केली.

गाड्यांचा चक्‍काचुर

पेठशिवणी नजीकच्या रस्तावर जीप (क्र. एमएच, २२, एएम ७३३३) व कार (क्र. एमएच ०४, ईटी २७३४) ही दोन्ही वाहने जात असताना वाहन चालकाचा ताबा सुटून एकमेकांना समोरासमोर धडक दिली. या अपघातात दोन्ही वाहनाचे समोरील बाजू चक्काचूर झाल्या आहेत. आतील तीन प्रवाशी जागेवरच ठार (Accident Death) झाले असून ४ ते ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. नागरिकांनी धाव घेत पालम शहरातील रुग्णवाहीका पाचारण करून जखमीना नांदेड (Nanded) व पालम येथे पाठवले आहे. मयत झालेल्या प्रवाशांची नावे अद्याप समजू शकली नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबई-पुण्यापेक्षा सोलापूर-मुंबई प्रवास सुसाट! 400 किमी प्रवास फक्त एक तासांत

Diabetes : पावसाळ्यात वाढतो मधुमेहाचा धोका, 'या' चुका करणे आताच थांबवा

Maharashtra News Live Update: बीडच्या केज शहरासह परिसरात दमदार पावसाला सुरुवात, शहरातील रस्ते जलमय

Dhananjay Munde : धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदासाठी साकडं, वाढदिवसाला कार्यकर्त्यांनी केली 'लाडूतुला'

Hair Care: केस धुतल्यानंतर लवकर सुकवण्यासाठी हेअर ड्रायर वापरताय? जाणून घ्या 'या' महत्त्वाच्या गोष्टी

SCROLL FOR NEXT