Selu Bajar Samiti Saam tv
महाराष्ट्र

Selu Bajar Samiti : मालमत्ता कराचे थकविले ७५ लाख; थकबाकीपोटी सेलू कृउबाला लावले सील

Parbhani News : सेलू नगर परिषदेअंतर्गत असलेल्या सेलू बाजार समितीकडे तब्बल ७५ लाख रुपयांची थकबाकी आहे. हि थकबाकीची रक्कम भरण्यासंदर्भात नगरपरिषदेने वारंवार नोटीस दिल्या आहेत

राजेश काटकर

परभणी : सेलू येथील कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्याकडे मालमत्ता कराची ७५ लाख रुपयाची थकबाकी आहे. नोटीस दिल्यानंतर देखील कराची रक्कम भरणा न केल्याने सेलू नगर परिषदेने बाजार समितीच्या सचिव, लेखापालाचे कार्यालय सील केले आहे. नगर परिषदेने आज हि कारवाई केली आहे. 

मोठ्या थकबाकीदारांकडील वसुली करण्यावर नगरपालिका, महापालिका प्रशासनांचा भर आहे. त्यानुसार सेलू नगर परिषदेअंतर्गत असलेल्या (Selu) सेलू बाजार समितीकडे तब्बल ७५ लाख रुपयांची थकबाकी आहे. हि थकबाकीची रक्कम भरण्यासंदर्भात नगरपरिषदेने वारंवार नोटीस दिल्या आहेत. मात्र बाजार समितीकडून थकबाकी भरण्याकडे दुर्लक्ष केले जात होते. यापूवीर्ती मालमत्ता कराच्या थकबाकी पोटी बाजार समितीला (Bajar Samiti) सील ठोकले होते. मात्र त्यानंतर अर्धी अधिक रक्कम भरून बाजार समितीने तात्पुरती सुटका करून घेतली होती. मात्र ती रक्कम वाढत जाऊन आज पुन्हा बाजार समितीला सील केले आहे. 

हमाल- मापाडीतही वाद 

दरम्यान आज सकाळी मोंढा परिसरात व्यापारी आणि हमाल मापाडी यांच्यात वाद निर्माण झाला होता. त्यात हमाल- मापाड्यांनी खासगी व बाजार समिती परिसरात काम बंद आंदोलन सुरू केले आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी दोघांनी खबरदारी घ्यावी; अशी मागणी होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT