Parbhani Dengue News  Saam TV
महाराष्ट्र

Parbhani News: परभणीत २० बालकांना डेंग्यूची लागण; एकाचा अचानक मृत्यू, अख्खं गाव तापाने फणफणलं

Parbhani Dengue News: परभणी जिल्ह्यातील किनोळा गावात २० बालकांना डेंग्यूची लागण झाली असून एका चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. अख्खं गाव तापाने फणफणलं आहे.

राजेश काटकर

Parbhani Dengue News

बदलतं हवामान आणि ऊन-पावसाच्या खेळामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात सध्या डेंग्यूची साथ पसरली आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासन सतर्क झालं असून नागरिकांना काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे. अशातच परभणी जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. किनोळा गावात २० बालकांना डेंग्यूची लागण झाली असून अख्खं गाव तापाने फणफणलं आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दुर्दैवी बाब म्हणजे, डेंग्यूने एका ८ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू देखील झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. रूद्र सुदाम खरवडे असं मृत्युमुखी पडलेल्या चिमुकल्याचं नाव आहे. रुद्र दुसरीच्या वर्गात शिक्षण घेत होता.

अचानक ताप आल्याने त्याला परभणी (Parbhani News) येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने डॉक्टरांनी त्यास नांदेड येथील रुग्णालयात पाठवले. परंतु तेथेही त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही.

त्यामुळे डॉक्टरांनी शनिवारी (९ डिसेंबर) रुद्रला हैदराबाद येथील रुग्णालयात अॅडमिट करण्याचा सल्ला दिला. मात्र, हैदराबाद येथे जाण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, रुद्रच्या अचानक मृत्युमुळे खरवडे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

रुद्रची मोठी बहीण दर्शना हिला देखील डेंग्यूची लागण झाली असून तिची प्रकृती स्थिर आहे. या पाठोपाठ किनोळा गावातली जवळपास १०० ते १५० लोकांना ताप आल्याने ते रुग्णालयात उपचार घेत आहेत. यातील जवळपास २० बालकांना डेंग्यू झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.

गाव डेंग्यूच्या आजाराशी सामना करत असताना आरोग्य यंत्रणा माञ याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. नागरिकांनी या बद्दल संताप व्यक्त केला आहे. हिवतापाचा आजार नियंत्रणासाठी जनजागृतीसाठी पंधरवडा पाळला जातो. मात्र, आरोग्य विभाग कुठलीही दक्षता घेत नसल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे.

Edited by - Satish Daud-Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: Dhule: गावच्या रस्त्यावर रिपोर्टिंग करणाऱ्या त्या शाळकरी मुलींना आदित्य ठाकरेंकडून सायकल भेट

Gen Alpha Club: 'रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते', त्र्यंबकेश्वरमध्ये रस्त्याची दुरवस्था, बाटलीचा माईक बनवून विद्यार्थ्यांनी मांडली व्यथा

Shravan Fasting : श्रावणात उपवासाला खा ८ चविष्ट पदार्थ, दिवसभर एनर्जी टिकून राहील!

Sangli : भाजप नेत्यांवर टक्केवारीचा आरोप, नगरसेवकांमध्ये धक्काबुकी; विरोधी पक्षनेते म्हणाले, भाजपपुढे झुकणार नाही! VIDEO

सांगलीत एसटी बसची समोरासमोर धडक, भीषण अपघातात 3 प्रवाशांचा जागेवर मृत्यू; 15 ते 20 जखमी

SCROLL FOR NEXT