खा.जाधवांनी खराब रस्त्याला पंतप्रधान मोदींचे नाव देत, अडवला राष्ट्रीय महामार्ग! राजेश काटकर
महाराष्ट्र

खा.जाधवांनी खराब रस्त्याला मोदींचे नाव देत, अडवला राष्ट्रीय महामार्ग!

जिल्ह्यातून जाणाऱ्या एकमेव राष्ट्रीय महामार्ग-61 चे काम गेल्या तीन वर्षांपासून रखडलेले आहे. त्यामुळे नागरिकांना वाहतुकीसाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

राजेश काटकर

परभणी : परभणी जिल्ह्याच्या सर्वच रस्त्यांची पावसाने पूर्ण चाळणी केली केली आहे. जिल्ह्यातील सर्वच रस्त्यांची अवस्था ही दयनीय झाली आहे. त्यात जिल्ह्यातून जाणाऱ्या एकमेव राष्ट्रीय महामार्ग-61 चे काम गेल्या तीन वर्षांपासून रखडलेले आहे. त्यामुळे नागरिकांना वाहतुकीसाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तर, दुसरीकडे या रस्त्याने अनेकांचे बळी घेतले आहेत.

हे देखील पहा :

रस्त्याचे काम लवकर पूर्ण करण्याच्या मागणीसाठी परभणीचे खासदार संजय जाधव यांनी आज भर रस्त्यात बसून रस्ता रोको करत आंदोलन केले. यावेळी या रस्त्याला त्यांनी निषेध म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी मार्ग असे नाव दिले होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम अभियंत्यांना खासदारांनी चांगलेच वेठीस धरल्याचे पाहावयास मिळाले. डिसेंबर अखेरपर्यंत हा रास्ता पूर्ण करणार असल्याचे आश्वासन अभियंता एस. एस .साहूत्रे यांनी या आंदोलनानंतर दिले आहे.

एकूणच खासदारांच्या आंदोलनामुळे तब्बल दोन तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. तर, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 वर वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या. या आंदोलनानंतर आतातरी या महामार्गाच्या कामाला गती येते का? हेच पाहणे औसुक्याचे राहणार आहे. डिसेंबर पर्यंत या रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही, तर यापेक्षा अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी खासदार जाधव यांनी दिला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT